श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने मायणी येथे दि. ९ ते १५ एप्रिल अखेर अखंड नाम -जप – यज्ञ सप्ताहाचे आयोजन

मायणी प्रतिनिधी

    अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ,दिंडोरी प्रणित शाखा मायणी ता.खटाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने गुरुवार दि. ९ एप्रिल ते बुधवार दि. १५ एप्रिल २०२ ६ अखेर अखंड नाम- जप- यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या कालावधीत मायणी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये वीणा वादन ,जप, स्वामी चरित्र वाचन, गुरुचरित्र पारायण ,नवनाथ पारायण, श्रीमद् भागवत पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण, दररोज विविध याग व शेवटी श्री सत्यदत्त पूजन व मांदियाळी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यज्ञ विभाग व कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे- दि. ८ ग्रामदैवत सन्मान, मंडल मांडणी. दि. ९ मंडळ स्थापना ,अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार .दि. १ ० नित्य स्वाहाकार श्री गणेश याग व श्री मनोबल याग. दि. ११नित्य स्वाहाकार चंडी याग. दि. १२ नित्य स्वाहाकार – श्री स्वामी याग. दि. १३नित्य स्वाहा कर श्री गीताई याग.दि. १४ नित्य स्वाहाकार श्री रुद्र याग. मल्हारी याग. दि. १५नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती सत्यदत्त पूजन अखंड नाम -जप-यज्ञ सांगता. याच दिवशी सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ८-भूपाळी आरती, सकाळी ८.१५ -नित्य स्वाहाकार ,सकाळी ८.३० ते १० गुरुचरित्र वाचन ,सकाळी १०.३० महानैवेद्य आरती, सकाळी १०. ४५ विशेष या ग ,दुपारी २ ते ५ श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पाठ वाचन ,सायंकाळी ५ ३० औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६ महानैवेद्य आरती, सायंकाळी ६.३० विविध विषयांवर मार्गदर्शन, सायंकाळी ७ नित्यसेवा व नित्य ध्यान.
तरी या पवित्र धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी व श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र , मायणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *