“सोहम शिर्के यांच्यावर पुन्हा विश्वास; आम आदमी पार्टीकडून सातारा जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी” आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांनी यापूर्वीच सोहम शिर्के यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने आता त्यांच्यावर अधिक विश्वास दाखवत सातारा जिल्हा प्रवक्ते ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.आम आदमी पार्टी ही पारदर्शकता, प्रामाणिक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कार्य करणारी पक्ष म्हणून देशभरात ओळखली जाते. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे हा पक्षाचा प्रमुख अजेंडा असून, महाराष्ट्रातही पक्ष संघटन मजबूत करत जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे आवाज देण्यावर भर दिला जात आहे.याच पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका ठामपणे आणि प्रभावीपणे जनतेसमोर मांडणे, तसेच सातारा जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करणे, या उद्देशाने ही जबाबदारी सोहम शिर्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. माण-खटाव तालुक्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही दुहेरी जबाबदारी सोपवली आहे.नियुक्तीनंतर सोहम शिर्के यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की,“माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जनसेवेच्या भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”तसेच त्यांनी सर्व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, संदीप देसाई (प्रदेश संघटन मंत्री) आणि धीरज जाधव (सातारा जिल्हाध्यक्ष) यांचे विशेष आभार व्यक्त केले.या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात आम आदमी पार्टीचे संघटन अधिक मजबूत होईल आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विविध स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Post navigation कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदारांचा आदेश! 10 दिवसांत नालाबांध पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माण-खटावच्या मूलभूत प्रश्नांसाठी आम आदमी पार्टीचा एल्गार; सोहम शिर्के यांचा आमरण उपोषणाचा इशारा