बिदाल प्रतिनिधी दि :

माण तालुक्यातील सत्रेवाडी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसेवक आपल्या कर्तव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मलवडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक दिवसभर उपस्थित असतात, मात्र तिथून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या सत्रेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात येण्यासाठी त्यांना नक्की काय अडचण येत आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

रिकाम्या खुर्च्या आणि रखडलेली कामे

सत्रेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांनी ठराविक दिवसांत उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांना दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर शासकीय कामांसाठी ताटकळत राहावे लागत आहे. कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सत्रेवाडी ग्रामपंचायतच्या कारभारावर ग्रामस्थांची प्रचंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!