सातारकरांसाठी नगरपालिका लोकप्रतिनिधी व अधिकारी उतरले रस्त्यावर


(अजित जगताप)

सातारा दि: सातारा शहराचा झपाट्याने विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातारा नगरपालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून आज शनिवारी सकाळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री अमोल मोहिते
यांच्या नेतृत्वाखाली विविध समिती सभापती व नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमवेत सातारच्या रस्त्याची पाहणी केली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी ऐतिहासिक राजवाड्यासमोरील रस्त्यावरील गोल बाग ते देवी चौक या राजपथाची पाहणी केली.
सदर राजपथावरील रस्त्याच्या कामकाजाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांची बैठक नगर पालिकेमध्ये आयोजित केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आज नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पाहणी केली . नियमित कर भरणारे नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
राजपथावरील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाते. त्यामुळे जो रस्ता कॉंक्रीटकरण होणार आहे त्याचे योग्य नियोजन करावे. जेणेकरून पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाणार नाही. ही मुख्य समस्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केली. काहींचे अतिक्रमण त्यांनी स्वतःहून दूर करावे. अशी सूचना करण्यात आली. ज्यांनी पार्किंगची जागा सोडली नाही. त्यांना यापुढे इमारत बांधकामास परवाना दिला जाणार नाही. असेही स्पष्ट केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर, विद्युत व्यवस्था त्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. याची दक्षता घेण्यात येत आहे. असे श्री अमोल मोहिते यांनी सांगितले.
सदर वेळी सातारा नगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती धनंजय जांभळे, ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोसले, नगरसेविका प्राची शहाणे, नगरसेवक सागर पावशे, पंकज चव्हाण,सुनीलकुमार भंडारे, नगरपालिका अधिकारी चिद्रे ,दहिफळे,वाठरे , तसेच एम.एस.ई.बी.चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी युट्यूब चॅनलच्या काही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला नगराध्यक्षांनी समर्पक उत्तर दिले.


फोटो– सातारा नगरपालिकेच्या रस्त्याची पाहणी करताना नगराध्यक्ष अमोल मोहिते व मान्यवर (छाया — अजित जगताप ,सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!