(अजित जगताप)

मेढा दि: जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये खाजगी विहीर व हातपंप आणि धरणाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते.तालुक्यातील दिवसाचे वीस पुरवठा लोडशेडिंग होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असूनही पाणी देता येत नाही. याबाबत वाढत्या तक्रारींकडे लक्ष केंद्रित करून जावळी तालुका किसान मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्ष राहुल माने यांच्या नेतृत्वाखाली कोरडवाहू व बागायत शेतकऱ्यांनी जावळीचे तहसीलदार मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जावळी तालुक्यामध्ये मेढा, करहर, तापोळा , केळघर भागात अतिवृष्टी आहे. तर सायगाव, कुडाळ भागात पुरेसा पाऊस नसल्यामुळे खाजगी विहिरी, हात पंप व धरणाच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते. सदर पाण्याचा उपयोग शेतीसाठी व्हावा या दृष्टीने शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बसवून घेतलेले आहेत. सर्व शेतकरी वेळेत पाणीपट्टी भरत आहेत. परंतु दिवसा पूर्ण वेळ अखंडित वीजपुरवठा होत असल्याने त्याचा परिणाम शेती उद्योगावर होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यासाठी किसान मोर्चाचे जावळी तालुका अध्यक्ष राहुल माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जावळीचे तहसीलदार श्री मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

सध्या जावळी तालुक्यात खरीप हंगाम आहे . शेती पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र, महावितरणकडून कृषी
फिडरवर दिवसा मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. दिवसा शेती उद्योगासाठी वीज मिळत नाही मात्र रात्रीच्या वेळेला वीज पुरवठा सुरळ सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. रात्रीच्या वेळी ला सरपटणारे विषारी प्राणी व झाडाझुडपाच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना दुखापत होत आहे. तरीही कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काही शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारातही हाती आलेल्या
पिकांना पाणी देण्यासाठी सक्तीने शेतात जावे लागते.
जावली तालुका हा डोंगररांगांनी व घनदाट जंगलाने वेढलेला परिसर आहे. रात्रीच्या अंधारात बिबट्या, रानडुक्कर, भटकी कुत्री, अस्वल यांसारखे हिंस्र
वन्यजीव तसेच विषारी सापांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यामुळे रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना शेतकऱ्यांना नाहक जीवधोक्यात घालल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ले व सर्पदंशाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे.
तरी जावळी तालुक्यातील प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषीपंपांचे दिवसाचे लोडशेडिंग तात्काळ पूर्णपणे बंद करण्यात यावे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसा पूर्ण वेळ आणि योग्य दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी. रात्रीचा वीजपुरवठा बंद ठेवून त्याचे नियोजन दिवसाच्या वेळेत करावे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा व हिताचा विचार करून जर लवकरात लवकर दिवसा अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही,
तर जावली तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यावेळेला जावळीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे, रणजीत शिंदे, समाधान पोफळे, युवा नेते इंद्रजीत भिलारे, विजय सपकाळ, हैबत पवार, राजेंद्र महाडिक, रणजीत शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन भिलारे, श्री अर्जुन जाधव तसेच तापोळा, केळघर, करहर, मेढा, सायगाव परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढे महावितरण कंपनीचे श्री बनकर यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान भाजप किसान मोर्चा ने शेतकऱ्यांच्या हिताबाबत आंदोलनाची भूमिका घेतल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे जावळी तालुका अध्यक्ष राहुल माने यांचे आभार मानले आहे.
…………………………….. फोटो- जावळीचे तहसीलदार श्री मुदगल यांना निवेदन देताना भाजप किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष राहुल माने व मान्यवर (छाया -अजित जगताप, मेढा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी