शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू : गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हसवड वार्ताहर…शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची पंचायत समिती माण भेट;शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिली. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.माण तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करणे, केंद्रनिहाय क्रीडा समन्वयक नियोजन, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्तावांचा पाठपुरावा, खान अकॅडमीच्या कामकाजातील अडचणी, क्रीडा समन्वयकांची केंद्रनिहाय पुनर्रचना, पटसंख्येनुसार करण्यात आलेले शिक्षक बदली व समायोजन, तसेच तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावा, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली.यावेळी शिक्षक समितीचे सातारा जिल्हा सरचिटणीस संतोष घोडके, सल्लागार राजेंद्र कदम, शिक्षक नेते रामदास जाधव, तालुका नेते काशिनाथ तोरणे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत दडस, सरचिटणीस सुशील त्रिगुणे, शिक्षक बँक संचालक नितीन काळे,कार्याध्यक्ष अजित हिंगे, सातारा विभागीय उपाध्यक्ष महादेव महानवंर, उपाध्यक्ष विनोद शिलवंत, कोशाध्यक्ष नवनाथ खरात, महिला आघाडी कार्याध्यक्ष रत्नमाला पवार आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रश्नांची विवीध मुद्दे सरचिटणीस सुशील त्रिगुणे यांनी मांडले.शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी सकारात्मक संवाद ठेवून त्यांची टप्प्याटप्प्याने सोडवणूक करण्यासाठी शिक्षक समिती प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष सूर्यकांत दडसयांनी सांगितले. Post navigation मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा – युवराज पाटील