वझरे येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गौरव संपन्न.. नाझरे प्रतिनिधीवझरे ता. सांगोला येथे उत्तम सरगर सर यांची कोळा विद्या मंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती, डॉक्टर प्रियांका कोकरे मेडिकल ऑफिसर घेरडी नियुक्ती, श्वेता कारंडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभियंता नियुक्ती, रत्नप्रभा जुंदळे रेड्डी यांची पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदी नियुक्ती, प्रशांत सरगर यांची पवित्र पोर्टल मधून स्वामी विवेकानंद संस्थेत सहशिक्षक नियुक्ती, संतोष पाटील यांची पवित्र पोर्टल मधून जिल्हा परिषद सोलापूर शिक्षक नियुक्ती व श्रुतिका विष्णू देशमुख एमबीबीएस प्रवेश या सर्व गुणवंतांचा गौरव महादेव मंदिर वझरे येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच मान नदीस तीन वेळा पाणी सोडल्याबद्दल आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचाही भव्य सत्कार करण्यात आला.सुरुवातीस प्रास्ताविक शिक्षक नेते उत्तम कोकरे यांनी केले तर शिक्षक नेते अशोक पाटील, नवनाथ बंडगर, प्राचार्य उत्तम सरगर, सत्कारमूर्ती शिक्षिका रत्नप्रभा रेड्डी, सेवानिवृत्त प्राचार्य के. वाय. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच पाण्याचा प्रश्न सोडविला विजेचा प्रश्न सोडवू व वाघमोडे वस्ती वझरे येथील मायाक्का मंदिरासाठी सभा मंडप देऊ असेही सत्कारमूर्ती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना मत व्यक्त केले.सदर प्रसंगी मा. सरपंच लिंगाप्पा पाटील, दामोदर कोकरे, उत्तम पाटील, विजय बंडगर, डॉ विजय सरगर, विष्णू देशमुख, संजय कोकरे, गंगाराम रेड्डी, मोहन रेड्डी, बाळासो वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, शाळा समिती अध्यक्ष सुभाष कोकरे, सोसायटी मा. चेअरमन दत्ता सरगर, संजय पाटील, महादेव वाघमोडे, जगन्नाथ वाघमोडे, बाळासो बंडगर, हाके मामा, दत्तात्रय आलदर, सुनील अडसूळ, लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, युवा नेते नितीन पाटील, राजू पाटील, रामा चोरमुले, शरद गुरव, संजय वाघमोडे, अशोक कोकरे, अमित शेंबडे, बाबासाहेब सरगर, बापूसो कारंडे, अनिल रेड्डी, सुरेश रेड्डी, बंडू कोकरे,महिला, युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नवनाथ बंडगर यांनी तर सर्वांचे आभार मा उपसरपंच सचिन कोकरे यांनी मानले. Post navigation आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी नवीन कौशल्ये अवगत करून उत्तम नागरिक घडवावेत: प्रा.प्रबुद्धचंद्र झपके पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा; ९ महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष