उपनगराध्यक्ष नितीन उर्फ आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न…


वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..


सांगोला प्रतिनिधी
माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला नगरीचे उपनगराध्यक्ष नितीन उर्फ आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त माणगंगा ऍग्रो मार्ट वाडेगाव रोड सांगोला येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले, यामध्ये हजारो रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला, यामध्ये हृदयरोग, त्वचारोग, कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग इत्यादी बाबत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत चष्मे वाटप ही करण्यात आले.
‌ सुरुवाती शिबिराचे उद्घाटन संपादक मोहन मस्के यांच्या शुभहस्ते व डिजिटल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश भाऊ सावंत, डॉक्टर शिवराज भोसले, डॉक्टर विजय बंडगर, डॉक्टर महादेव आलदर, डॉक्टर भारत गरांडे, रोटरी अध्यक्ष माणिकराव भोसले, आपुलकी अध्यक्ष राजेंद्र यादव, माणगंगा परिवाराचे व्हॉइस चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगोले, अश्विन कुमार इंगोले, डॉक्टर दत्तात्रय इंगोले, संचालक आण्‍णासो केदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले, तर प्रतिमापूजन सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, सीए किसन माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अनेकांना रोजगार देणारे व शेतकऱ्यांना सोयी सुविधा देणाऱ्या आबासाहेब आहेत असे मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, राजेंद्र यादव, मा. नगरसेवक गजानन बनकर, डॉक्टर निरंजन केदार, माणिकराव भोसले यांनी मनोगतात सांगितले तर मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना जेवण तसेच शालेय साहित्य वाटप करून एक सामाजिक उपक्रम राबवून दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे आबासाहेब आहेत असेही संचालक विजय वाघमोडे यांनी सांगितले.
सदर प्रसंगी शिवसेना नेते सागर दादा पाटील, दिग्विजय दादा पाटील, नगराध्यक्ष आनंदा माने, गटनेते प्रशांत धन वजीर, नगरसेवक अरुण पाटील, सोमेश यावलकर, काशिलिंग गावडे, जि प सदस्य दादासाहेब लवटे, अतुल मालक पवार, युवा सेना अध्यक्ष गुंडा दादा खटकाळे, उद्योगपती प्रमोद दादा साळुंखे पाटील, विष्णुपंत केदार, विठ्ठल परिवाराचे संस्थापक दीपक राव बंदरे, डॉक्टर मच्छिंद्र सोनलकर, डॉक्टर सुशांत बनसोडे, डॉक्टर परेश खंडागळे, डॉक्टर सचिन गवळी, डॉक्टर धनंजय गावडे, डॉक्टर संतोष शिंदे,डॉक्टर अमर शेंडे, डॉक्टर धनाजी जगताप, डॉक्टर माधव खबाले, डॉक्टर शिंगण, डॉक्टर अभयसिंह देशमुख, डॉक्टर संतोष पिसे, पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे सर मानगंगा संस्थेचे चेअरमन अर्चनाताई इंगोले, संचालक अण्णासो केदार, महादेव शिंदे, गजानन देवकर, नागरिक, महिला, माणगंगा परिवाराचे सर्व सभासद, संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक विवेक घाडगे यांनी तर सर्वांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे यांनी मानले.
__________________________


माणगंगा ऍग्रो मार्ट मार्फत वाढदिवस एक निमित्त समजून आपण शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देऊ व सामाजिक हित जोपासून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच सर्व रोग निदान शिबिरासाठी सर्व डॉक्टर, लॅब टेक्निकल यांचे मोलाचे योगदान लाभले व चांगला उपक्रम राबविता आला व यापुढेही राबवू व जनसेवा करू.
नितीन उर्फ आबासाहेब इंगोले, संस्थापक माणगंगा परिवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी