म्हसवड वार्ताहर –

माण तालुका शिक्षक समितीतर्फे आदर्श गुरुजनांचा तसेच
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व नवनियुक्त आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या आदर्श गुरुजनांचा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच नवनियुक्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान देणाऱ्या गुरुजनांचा गौरव करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, जिल्हा सरचिटणीस संतोष घोडके, सल्लागार राजेंद्र कदम, शिक्षक नेते रामदास जाधव, तालुका नेते काशिनाथ तोरणे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत दडस, सरचिटणीस सुशील त्रिगुणे, संचालक नितीन काळे, महिला आघाडी कार्याध्यक्ष रत्नमाला पवार, शिक्षक नेते सुनील महामुनी, धनंजय शिंगटे, विभागीय उपाध्यक्ष महादेव महानवर, उपाध्यक्ष विनोद शीलवंत, कोषाध्यक्ष नवनाथ खरात, कार्याध्यक्ष अजित हिंगे, प्रवीण शीलवंत, आकाराम ओंबासे, नामदेव पवार आदी उपस्थित होते.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सागर जाधव व शिक्षिका केशर माने यांचा तसेच नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रशांत कारंडे, विष्णुदास बिरादार, अनिल मनाळे, दत्तूकुमार खाडे, महादेव जाधव, विक्रम माने, शेषाबा नरळे, अशोक यलमार, प्रकाश चवरे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच आदर्श शिक्षिका म्हणून निवड झालेल्या प्रियांका बोराटे, मनीषा बोराटे, सुप्रिया चिरमे व प्रियांका साठे यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही शिक्षक समितीची सकारात्मक परंपरा असून, अशा उपक्रमातून शिक्षकांना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यापुढेही करण्यात येईल, असे शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी