सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार


​सांगोला (प्रतिनिधी)

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ वा स्मृती समारोह २०२६ आयोजित पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा ४४ वर्षांची समृद्ध परंपरा जोपासत दि.४,५ व ६ सप्टेंबर या कालावधीत प्रचंड उत्साहात संपन्न झाल्या.अंतिम सामन्यावेळी मुंबईच्या नागपाडा बास्केटबॉल अकॅडमीला ६०-५५ असे ५ गुणाने नमवित पुण्याच्या संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीने झपके कुटुंबीयांकडून दिले जाणारे गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक व रोख रक्कम एकतीस हजार रुपये मिळवत विजेतेपद पटकाविले या स्पर्धेमध्ये उपविजेता
नागपाडा बास्केटबॉल अकॅडमी मुंबई,तृतीय पारितोषिक-
नेक्सस स्पोर्टस् अकॅडमी, नांदेड,चतृर्थ पारितोषिक –
जयहिंद जिमखाना कडा, बीड,पाचवे पारितोषिक कॉर्टर फायनल मध्ये उपविजयी संघ G.K.P. मुंबई,BSC BEG ४ सेंटर खडकी पुणे,श्री.केरळा वर्मा,त्रिसुर केरळ,
एस एन सी नागपूर,सहावे पारितोषिक साखळी सामन्यातील दुस-या क्रमांकाचा संघ, हाथ फाय युथ फाउंडेशन मुंबई,टिम -काश नागपूर,
मस्तान – YCMAमुंबई, समायरा अकॅडमी मुंबई,ग्रीन स्टार स्पोर्टस् क्लब सोलापूर,डू ईट बास्केट बॉल अकॅडमी, कोल्हापूर,भारती विद‌यापीठ पूणे,शिवरत्न स्पोर्टस अकॅडमी अकलुज तसेच
उत्कृष्ट खेळाडू –
फय्याज शेख, नागपाडा, बेस्ट शुटर-तनय तट्टे एसकेबीए, पूणे, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू –
श्ववण बनकर, सांगोला
या संघास झपके कुटुंबीयांकडून कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सोलापूर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंचे मास्टर्स टीम तयार करून विशेष सामने खेळवले गेले त्यामधील कोल्हापूर मास्टर्स संघ विजयी झाला, विजय संघ खेळाडू व सर्व सहभागी खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कवी सुनील जवंजाळ लिखित विद्यामंदिर गीताच्या सादरीकरणाने झाली.
यावेळी व्यासपीठावर पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ड१ प्रांतपाल ला.राजेंद्र शहा-कांसवा,ला.रंजना कासवा, प्रमुख उपस्थिती असणारे माजी नगरसेवक पुणे व राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू राहुल भंडारे, भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार, मार्गदर्शक व या मैदानाचे खेळाडू संभाजी कदम, संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे संचालक शरद नागणे,लायन प्रांतीय खजिनदार ला.सुरेश जाजू, संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते.
प्रास्ताविकातून संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी
राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जात असलेल्या या बास्केटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे. दरवर्षी पावसाचा देते व्यत्यय सामन्यांना येत होता त्यामुळे गेल्या वर्षी बास्केटबॉलचे दोन अद्ययावत कोर्ट बनवण्यात आले आहेत. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीची यशस्वी सुरूवात झाली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील आमचे विद्यार्थी, युवक या राष्ट्रीय स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घेतील असा विश्वास वाटतो.प्रमुख पाहुणे प्रांतपाल ला.राजेंद्र शहा-कांसवा आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले मला लहानपणापासूनच कबड्डी या खेळाची प्रचंड आवड होती. त्यामुळे मैदानावर उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूची जिद्द आणि उत्साह मी अगदी जवळून जाणतो. सांगोल्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आणि नियोजनबद्ध आयोजन होणे, हे खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमासाठी देणगीदार विलास क्षीरसागर,सुहास होनराव, श्रीनिवास देशपांडे,सिद्धार्थ झपके, ज्ञानेश्वर तेली,नागेश तेली, विवेक घोंगडे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य दिगंबर जगताप,शीलाकाकी झपके,विश्वेश झपके, विविध राज्यातील निमंत्रित खेळाडू त्यांचे मार्गदर्शक , गावातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा प्रेमी,पत्रकार यांच्यासह विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के, सर्व पदाधिकारी,सामना समिती सर्व पदाधिकारी, क्रीडा शिक्षक,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.पंच सत्कार निवेदन प्रा.डी.के पाटील यांनी केले. पारितोषिक समारंभाचे निवेदन सुनील भोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य चारूदत्त जगताप यांनी केले.

– गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल पारितोषिक वितरण समारंभाच्या सुरुवातीला सादर झालेल्या विद्यामंदिर गीताने सर्वांना भावूक केले. काल झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मिळवलेले हे प्रेम आणि आदर हीच आयुष्यातील खरी कमाई आहे. पैसा आणि प्रसिद्धी तात्पुरती असते, मात्र ४५ वर्षांनंतरही गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे नाव आज आदराने घेतले जाते. त्यांच्या प्रेरणेने आणि दूरदृष्टीमुळेच विद्यार्थ्यांना आज उत्कृष्ट इनडोअर कोर्टसारख्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या योगदानाबद्दल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे विशेष आभार. संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी विमाननगर’ पुणे प्रमाणेच गुरुवर्य बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीच्या टीमनेही भविष्यात अंतिम फेरीत जिंकून मोठे यश मिळवावे, हीच सदिच्छा.


संभाजी कदम
कर्णधार व मार्गदर्शक, भारतीय बास्केटबॉल संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी