राज्यातील प्रथमच प्रयोग शिष्यवृत्ती विध्यार्थीना केंद्र शाळेत मार्गदर्शन

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता चौथीच्या विध्यार्थीना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे म्हणून केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
या केंद्राचे उदघाट्न पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्र प्रमुख सतीश शिंदे म्हणाले की शिष्यवृत्ती परीक्षेत या केंद्रातील विध्यार्थी नेहमी यश मिळवितात. भविष्यात या केंद्रातील अनेक विध्यार्थीना यश मिळावे म्हणून प्रत्येक रविवारी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विध्यार्थीना वेगवेगळे शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. याचा विध्यार्थीना फायदा होणार आहे.
यावेळी सरपंच रणजित जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर खरडकर, पल्लवी कोले, नागेश पाटील, कवडे, दत्ता केसकर, बापू चौगुले, रणजित इंगळे, विजय सुरपुसे, अमोल शिंदे, सोमनाथ शिंगटे, अमोल पेठकर, सागर लोखंडे,प्रशांत माळवदे,मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पं. भा.गायकवाड, शिक्षक, पालक विध्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी