शिक्षक हा समाज विकासाचा दीपस्तंभ-कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हसवड… प्रतिनिधीशिक्षक हा समाज मन व मानवी जीवन भविष्याचा शिल्पकार आहे. तसेचशिक्षक हा सर्वांगीण दृष्ट्या समाज विकासाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर ,संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पुनम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले शाळेत शिक्षक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले. लोकशाहीतील राष्ट्रपती हे सर्वोच्च पद व त्यांचा भारतरत्न या पुरस्काराने झालेला सन्मान ही बाब शिक्षकासाठी अभिमानाची आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची वाट दाखवून स्वप्नाची उंच भरारी घेण्याचे शिक्षण शिक्षक देत असल्याचे असल्याची माहिती विश्वंभर बाबर यांनी दिली.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथील गेल्या पंचवीस वर्षातील शैक्षणिक विकास हा आमच्या अभ्यासू व ध्येयवादी शिक्षकामुळेच झाल्याचे विश्वंभर बाबर यांनी स्पष्ट केले .संस्थेच्या विकासाचे खरे मानकरी क्रांतिवीर संकुलातील शिक्षक असल्याचेही सांगितले . विद्यार्थ्यांनो तुम्ही विज्ञानवादी रहा. उच्च ध्येय ठेवा, अवांतर वाचन करा, महामानव, व युगपुरुषांच्या चरित्राचे वाचन करा , त्यांच्याकडून प्रेरणा घ्या असे आवाहन विश्वंभर बाबर यांनी केले.यावेळी उपशिक्षिका साधना दुधाळ , विद्यार्थी प्रतिनिधी आदिनाथ काळेल, चेतना खांडेकर, स्नेहल येवले, आदिती हुद्देदार, श्रावणी कलढोणे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींनी दिवसभर शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल लुबाळ व स्वप्नाली बोडरे यांनी केले. Post navigation शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान; पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या दोन भगिनींचा गौरव. भाळवणीत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन संपन्न