शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान; पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या दोन भगिनींचा गौरव. (मुरुम प्रतिनिधी) मुरूम भारत शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, येथे शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार तसेच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी. टी. इंगोले होते.यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, माजी प्राचार्य राम जाधव तसेच माजी प्राध्यापक जीवन जाधव, गणपत बेलकोने, दिनकर देशमुख, जवाहर चनशेट्टी, आर. व्ही. जाधव, डी. बी. कांबळे, एस. जी. गायकवाड, अशोक वडतीले आदींचा सन्मान करण्यात आला.तसेच महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थिनी सख्ख्या बहिणींची पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. साक्षी बालाजी इंगोले यांची सोलापूर जिल्हा परिषदेत, तर सुषमा बालाजी इंगोले (कवठे) यांची सातारा जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले यांनी महाविद्यालयातून विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या यशोगाथा मांडल्या. तसेच महाविद्यालयाची होत असलेली उत्तरोत्तर प्रगती व शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली.अध्यक्षीय समारोपात डी. टी. इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, संस्कार, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर जीवनात यश मिळविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत चौधरी व बाळासाहेब मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation प्रदिप पोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… शिक्षक हा समाज विकासाचा दीपस्तंभ-कृषिरत्न विश्वंभर बाबर