अजित जगताप
आनेवाडी दि:4

जावळी तालुक्यातील शांत व संयमी भाग म्हणून ओळखणाऱ्या सायगाव परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत ना काहींना आस्था.. ना कार्यकर्त्यांना काळजी… अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी सायगाव परिसरातील रस्ते व नागरी सुविधांबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या लक्षवेधी सूचनांमुळे तातडीने अधिकारी वर्ग उपाययोजना करीत होते . आता ठेकेदार कम कार्यकर्ता यांचीच गर्दी झाल्यामुळे दर्दी कार्यकर्ता उरलेला नाही.
भिंतीवरील पाल म्हणजे काही बिदागी बहाद्दुरांना डायनासोर वाटत आहे. हा त्यांचा दोष नसून आर्थिक निकषावर सध्या जोर दिला आहे. त्यामुळेच तर सायगाव भागात जानकर मंडळींना विकास शोधावा लागत आहेत. प्रत्येक जण समस्याने व्यतीत आहे. पण मताच्या आकडेवारीनुसार केलेली चूक आणि त्याची फळ भोगत आहेत.
सातारा पुणे महामार्गावरील आनेवाडी फाटा ते मेरू लिंग हा रस्ता खऱ्या अर्थाने अडथळ्याच्या शर्यतीसाठी उपयुक्त ठरणारा रस्ता आहे. त्या दृष्टीने स्पर्धा आयोजित केली तर खऱ्या अर्थाने खेळाडूंचा कस लागणार आहे. सध्या आनेवाडी, रायगाव खर्शी तर्फ कुडाळ, सायगाव, महीगाव महामूलकरवाडी पवारवाडी, येरुणकरवाडी , प्रभूची वाडी मोरघर धनगर पेढा ते पुढे जावळी तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढ्यापर्यंतचा रस्ता नादुरुस्त झालेले आहे. स्थानिकांनी आपले राजकीय वजन वापरून या रस्त्याची डागडुजी करावी. देवाला भुकेल्यासमोर यायचे असेल तर भाकरीच्या रूपाने यावे लागेल तशा पद्धतीने उपस्थित केलेल्या प्रश्नाला चाल ढकल करण्यापेक्षा रस्त्याची दुरुस्ती करूनच उत्तर द्यावे अशीही मागणी होत आहे.
………………………………………..
फोटो– सायगाव भागातील रस्त्याच्या दुरावस्थेची अनुभवी कार्यकर्त्यांनी दखल घेतली (छाया- अजित जगताप, सायगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी