मुरूमच्या ‘मानाचा आजोबा किसन गणेश मंडळा’चा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने सुरू; प्रतिष्ठापनेपूर्वी भव्य रक्तदान शिबिर (मुरूम प्रतिनिधी) शहरातील ७७ वर्षांची परंपरा असलेल्या आणि धाराशिव जिल्ह्याचा ‘मानाचा आजोबा गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किसन गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ चा प्रारंभ सामाजिक उपक्रमाने करण्यात आला. गणेश प्रतिष्ठापनेच्या पहिल्याच दिवशी मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजसेवेचा आदर्श संदेश दिला आहे. सोमवार (ता. १४) रोजी सकाळपासून आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.उत्सव केवळ मनोरंजन न राहता समाजसेवेची प्रेरणा ठरावा, या उद्देशाने मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवते. यंदाही ही परंपरा कायम राखत पहिल्याच दिवशी रक्तदानासारखा उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सायंकाळी ७ वाजता श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सूर्यकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अरविंद फुगटे, अनिल भुसाळे, ईश्वरचंद्र अंबर आणि रवींद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात रक्तदात्यांना गणेश मूर्ती भेट देण्यात आली. विशेष म्हणजे, युवती व महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून ‘महिलांच्या रक्तदानामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते’ हा संदेश दिला.शिबिराचे यशस्वी आयोजन किसन गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल सत्रे, उपाध्यक्ष स्वप्निल जाधव, सचिव पवन फुगटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्तांच्या सहकार्याने झाले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे विजय केवडकर, ऋतिक म्हेत्रे, स्वप्निल देशमुख, राहुल कांबळे यांनी रक्तसंकलनाचे व्यवस्थापन पाहिले. गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या वतीने यापुढेही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील किसान गणेश मंडळाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर, रक्तदाते व रक्तपेढीचे कर्मचारी वृंद. Post navigation अभिनेत्री व नुत्यांगणा शिल्पा शाहीर नागपुरकर यांचा २० वर्षा चा संघर्ष