संस्कार भारतीच्या कार्यशाळेत योगेश सोमण आणि प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन; सातार्‍यात कथालेखन व कथाकथन कार्यशाळेचे आयोजन

सातारा: संस्कार भारती जिल्हा समिती सातारा यांच्या वतीने मराठी साहित्यातील दिग्गज लेखक व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून नवोदित तसेच महाविद्यालयीन लेखकांसाठी विशेष ‘कथालेखन आणि कथाकथन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत कथा लेखनाचा आकृतीबंध कसा असावा, तसेच कथेचे नेटके सादरीकरण कसे करावे, या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

दिग्गज कलाकारांची उपस्थिती कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि सुप्रसिद्ध लेखक व अभिनेते प्रमोद पवार उपस्थित राहणार आहेत. या अनुभवी कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे नवोदित लेखकांच्या लेखन प्रवासाला योग्य दिशा मिळून कथाकथन या सादरीकरण कला प्रकारातील कौशल्य वृद्धिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे.

कार्यशाळेचा तपशील:

  • दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
  • वेळ: दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत
  • स्थळ: शाहू सभागृह, कला व वाणिज्य महाविद्यालय (कोटेश्वर मैदानासमोर), सातारा.
  • प्रवेश शुल्क: ₹१००/- (प्रति व्यक्ती)

या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत खालील क्रमांकांवर संपर्क साधून आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक:

  • मुकुंद फडके: ९५५२५९३२९७
  • संजीव आरेकर: ८१४९९१२६८७
  • दिलीप चरेगावकर: ९९२१९५८०४२
  • रसिका केसकर: ९४२०६३०३७४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *