मुंबई (विशेष प्रतिनिधी):
आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित “१ ला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६” दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये रविवारी (दि. १२ जुलै) अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध दिग्गजांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री. रघुनाथराव ढोक यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “जनसेवा रक्षक पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार व जादूगार सन्मा. श्री. श्रीधर कीर, “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री. अरुण म्हात्रे, ‘दर्याचा राजा’चे संपादक साहित्याचार्य श्री. पंढरीनाथ तामोरे, आणि जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर उपस्थित होते.
तसेच शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल भार्गवराम शिर्के, ‘सी आय बी’ संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. वैभव सुरेश कदम, शुश्रूषा हॉस्पिटलचे माजी कोषाध्यक्ष व संचालक श्री. कृष्णा बाळू काजरोळकर, प्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक अ‍ॅड. गौरव जयवंत पाटील आणि ‘स्पेस रिअलटर्स’चे श्री. अतुल तोडकरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करत, समाज घडवण्यामध्ये लेखणी आणि सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या सन्मानार्थी मध्ये विलास खरात, विजय टाकणे, मिर्झा गालिब ,राहुल खरात, सचिन वाघमारे, सुधीर पाटील, दादासो वाकसे, सदाशिव पुकळे, राजू शेख, अनुश्री खांडेकर, योगिता कोठेकर, डॉ. दीपक खरात, जावेद शेख, फिरोज शेख सोबत अनेक महाराष्ट्रातील पत्रकारउपस्थितीत बांधवाचा निर्भीड जागरूक पत्रकारिता बद्दल देखील सन्मान केले. , कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि संयोजन पाहता उपस्थितांनी आयोजक आर्यारवी एंटरटेनमेंटचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन आर्यारवी एंटरटेनमेंटचे प्रमुख, प्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *