पिपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

शिवकृपा सहकारी
पतपेढी लि; मुंबई या संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात रूपये ८०९ कोटी विक्रमी व ऐतिहासिक व्यवसाय वाढ करून एकूण ५,९३४ कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. सहकाराचा दीपस्तंभ असणारी शिवकृपा पतपेढी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त केलेली आदर्श व अग्रगण्य संस्था आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी सांगितले.

दि. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी ३,३२६ कोटी, कर्ज २,६०८ कोटी, असा एकूण ५,९३४ कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेने पूर्ण केला आहे. सुरक्षित कर्ज वितरण, कर्ज वसुलीतील सातत्य व प्रभावी नियंत्रण ठेवून नियोजनबद्ध कामकाज करत थकबाकी कमी करण्यात यश मिळवले आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचा एकूण स्वनिधी रूपये ४१६ कोटी इतका झाला आहे. संस्थेस एकूण रूपये ६३ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शिवकृपा पतपेढीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेच्या एकूण १०२ शाखा, २ क्षेत्रीय कार्यालये, १० स्वतंत्र विभागीय कार्यालये व शिवकृपा भवन हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय रबाळे, नवी मुंबई येथे कार्यरत आहे. सहकाराला अध्यात्माची जोड देत सहकार क्षेत्रात काम करत असताना अर्थकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणे हे शिवकृपाने आद्य कर्तव्य मानून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे. शिवकृपा पतपेढीस महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांनी २१ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. संस्थेच्या सभासदांना तत्पर, कार्यक्षम व दर्जेदार सेवा देता यावी, या हेतूने संस्थेचे कर्मचारी व प्रतिनिधींना कोरेगाव, जि. सातारा येथील शासन मान्यताप्राप्त स्वतंत्र व निवासी प्रशिक्षण केंद्रातून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

संस्थेने ठेव, कर्ज, वितरण व वसुली या प्रत्येक स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. ही बाब अत्यंत आनंददायी असल्याचे मत संस्थेचे संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांनी व्यक्त केले.

संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी, प्रतिनिधी व संचालक मंडळ या सर्वांचे योगदान याकरिता महत्त्वपूर्ण आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच संस्थेस व्यवसाय वाढीचा उल्लेखनीय टप्पा पार करता आला. संस्थेच्यावतीने या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे मनापासून अभिनंदन करत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!