म्हसवड…. प्रतिनिधीहरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्य कृषी दिनानिमित्त क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध कृषी विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेतली .राज्यात १ जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस होय. या कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने शिवार फेरी व शेतभेटीचे आयोजन केले होते. वरकुटे म्हसवड येथील शेतकरी राजाराम रामचंद्र घाडगे यांच्या शेतीला क्रांतीवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शेतीच्या मशागतीमध्ये नांगरणी, कुळवणी,पेरणी, वाफा,वाकुरे व अळी पद्धती, इत्यादी बाबतची माहिती घेतली. याबरोबरच विविध शेती अवजारे यांची ही ओळख विद्यार्थ्यांनी करून घेतली. पेरणी योग्य जमिनीचा वापसा तसेच विविध धान्य प्रकार, कडधान्य जाती वाण इत्यादी प्रकाराची ओळख शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.या निमित्ताने तमाम जनतेला आवश्यक असणारे धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान कृषी दिनानिमित्त क्रांतीवीर शाळेतर्फे करण्यात आला.संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर, क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या मार्गदर्शनानुसार हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम कृषी दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करण्याचा उपक्रम उपशिक्षक तुकाराम घाडगे व दस्तगीर आतार यांनी यशस्वीपणे पार पाडला. Post navigation सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांची शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिले निवेदन. आटपाडी येथे होलार समाज कार्यालयाचे उद्घाटन….