माणदेशी सुपुत्र तथा अक्कलकोटचे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांचा अनुलोम परिवारातर्फे गौरवशाल, पुष्पगुच्छ व ‘चाणक्य नीती’ ग्रंथ देऊन सन्मान; सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही 📍 म्हसवड | प्रतिनिधीमाणदेशी भागातील सुपुत्र तथा अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राजेंद्र टाकणे यांचा अनुलोम परिवारातर्फे नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. नांदेड येथे यशस्वीपणे सेवा बजावल्यानंतर त्यांची अक्कलकोट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.अनुलोम परिवाराच्या वतीने राजेंद्र टाकणे यांना शाल परिधान करून, आकर्षक पुष्पगुच्छ तसेच प्रेरणादायी ‘चाणक्य नीती’ ग्रंथ भेट देत सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.राजेंद्र टाकणे यांनी सत्काराला उत्तर देताना अनुलोम परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘देव वृक्ष लागवड’ या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करत, “समाजहितासाठी राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत मी स्वतः सहभागी होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.यावेळी पंढरपूर भाग जनसेवक रामेश्वर कोरे, अक्कलकोट भाग जनसेवक काशीनाथ पाटील, अनुलोम मित्र महेश वागदरे, समर्थ कुंभार, राजेश राठी तसेच युवा नेते सचिन कलबुर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी राजेंद्र टाकणे यांच्या कार्यपद्धती, शिस्तप्रियता व जनसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक, पर्यावरणपूरक व जनकल्याणकारी उपक्रमांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मिळणारे पाठबळ प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. Post navigation मुंबई- पुणे रस्ता बंद…… तरीसुद्धा एम.एस.आर.डी.सी .टोल प्लाझा कडून सेवामुक्त लूट … मायणी बसस्थानक समस्यांच्या विळख्यात