सातारा (अनिल वीर यांजकडून) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रश्नावर सुरू केलेले रिपब्लिकन सेनेचे आंदोलन आठवड्यानंतर प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्याने संपले.जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे व जिल्हाध्यक्षा पुजाताई बनसोडे यांनी केलेल्या अखेरच्या दिवशी केलेले आक्रमक पण जीवघेणे केलेले लक्षवेधक आंदोलन निर्णायक ठरले.खरोखरच,त्यांचा आपणास अभिमान आहे.असे गौरवोद्गार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी काढले.रिपब्लिकन सेनेने प्रशासनाविरोधात अनोखे असे आंदोलन करत संताप व्यक्त केला. तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला. आठवडाभरात विविध प्रकारची आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या पगारात भागत नसल्यामुळे आम्ही तारेवरची कसरत करून जमा केलेले पैसे त्यांना देणार आहोत.असा उपरोधिक टोला उबाळे यांनी लगावला.अखेरच्या दिवशीजिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्षा पूजाताई बनसोडे आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिल्याप्रमाणे आक्रमकपणे फाशी घेण्यासाठी कांबळे मुख्य प्रवेशद्वारावर चढले तर बनसोडे यांनी अंगावर डिझेल ओतून काडीची पेटी मागत होत्या.या सर्व गदारोळात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.सात दिवस उपोषण करूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. सरतेशेवटी उपजिल्हाधिकारी यांनी लेखी दिल्याने अखेर आंदोलन शमले. आठवड्यानंतर आंदोलनाला यश मिळाले ! फोटो : आंदोलन संपल्यानंतर रमेश उबाळे यांच्यासमवेत पूजा व अक्षय तसेच कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर) Post navigation राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सातारा जिल्हा परिषदेत गौरव माण तालुक्यात म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; वरकुटे-मलवडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त