म्हसवड( वार्ताहर )—

धुळदेव तालुका माण येथील माणदेशातील दुष्काळात व मेंढरांच्या ताफ्यात वाढलेल्या पप्पू ढवळे यांनी परीक्षेत उज्वल यश मिळवून पीएसआय झाला. याबद्दल त्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्याचे अभिनंदन केले.
माणदेशातील दुष्काळाने होरपळलेली माती… अंगावर उन्हं-वादळं झेलणारी जीवनशैली मेंढरांच्या वाडग्यात वाढलेलं बालपण… आणि डोळ्यातील मोठं स्वप्न…
धुळदेवच्या एका साध्या मेंढपाळ शेतकरी कुटुंबात जन्मलेला पप्पू ढवळे.
घरची परिस्थिती एवढी कठीण की उद्याचं काय हेही ठरत नव्हतं.वडील आयुष्यभर डोंगर-दऱ्यात फिरत मेंढर राखत राहिले…
आईनं पोटाला चिमटा काढून मुलाच्या शिक्षणाची ज्योत जिवंत ठेवली…
पण जिद्द म्हणतात ती अशीच असते!तीन वेळा अपयशानं पाय खचला… तरी हा पोरगा थांबला नाही…
डोळ्यातलं स्वप्न जिवंत ठेवलं… आणि चौथ्या प्रयत्नात थेट PSI बनून दाखवलं! आज तोच पप्पू ढवळे धुळदेव गावातील पहिला PSI ठरलाय.
गावकऱ्यांनी आनंदाने मिरवणूक काढली, साखर वाटली.पण सगळ्यात मोठा क्षण कोणता ठरला तो म्हणजे आईच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाचे अश्रू…!
ही फक्त एका पोराची गोष्ट नाही ही माणदेशाच्या कष्टाची, जिद्दीची आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या हट्टाची कहाणी आहे!

मेंढरांच्या मागं जन्मलेला पप्पू ढवळे PSI होईपर्यंतचा हा थरारक प्रवास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!