पंढरपूर वृत्तसेवा

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार ना पंकज भोयर

श्रीक्षेत्र पंढरपूर, दि. २२ मार्च :
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांचा दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग दि. २१ व २२ मार्च रोजी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे उत्साहात संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शालेय शिक्षण, गृह व सहकार राज्यमंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी आभासी पद्धतीने केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास शेषाद्री अण्णा डांगे, डॉ. कैलास करांडे, डॉ. बी. पी. रोंगे, प्रा. डॉ. प्रदीप खेडकर, प्रा. डॉ. शेखर चंद्रात्रे व प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे उपस्थित होते. शासन शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बाबत लवकरच मा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रशिक्षण वर्गातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले

महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील सुमारे ३५० कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात एकूण सात सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘एनईपी २०२०’, त्याची अंमलबजावणी व शिक्षकांची भूमिका, ‘विमर्श’, संघटन कार्य, तसेच ‘AI आणि भविष्यातील शिक्षण’ व ‘पंच परिवर्तन दायित्व बोध’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रांमध्ये शेषाद्री डांगे, सचिन लादे , भिखाभाई पटेल, संदीप सावेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. प्रदीप खेडकर यांनी समारोपप्रसंगी या प्रशिक्षण वर्गातून शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक विस्तारात आमूलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. पंढरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांनी समारोप कार्यक्रमास उपस्थित राहून ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने कार्य करणाऱ्या शिक्षक परिषदेच्या कार्यास शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, कार्यवाह पुरुषोत्तम काळे, कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, संघटन मंत्री सुरेश दंडवते, प्रांत प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, रमेश क्षीरसागर, किरण कुंभार, सहकार्यवाह राकेश आव्हाड, किशोर पिसे, नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ. अवधूत वानखेडे, महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे, सहप्रमुख सुरेखा ताजवे, मराठवाडा विभाग अध्यक्ष संजय कोठाळे, नाशिक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल, नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे, डॉ. सचिन लादे , सुनील जगताप आबा देवकुळे व रामेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!