म्हसवड ( सुशिल त्रिगुणे)–

प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी म्हसवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुजा सचिन विरकर मॅडम ,पंचायत समिती माण चे नुतन सभापती विक्रम शिंगाडे साहेब,म्हसवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा श्रीदेवी निशांत पिसे ,
म्हसवड नगरपरिषदेच्या नगरसेविका चैताली शिंदे ,शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती माण शमीमबानु तांबोळी ,जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका मालन सावंत , कमल चव्हाण , सुशिला ढोबळे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.


तसेच मे महिन्यात सेवानिवृत्त होत आसलेल्या दिपांजली पतंगे .शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम यांना सेवानिवृत्तीच्या सन्माननीय सभापती विक्रम शिंगाडे साहेब व नगराध्यक्षा पुजा सचिन विरकर मॅडम व श्रीदेवी पिसे मॅडम व नगरसेविका चैताली अनिल शिंदे मॅडम यांच्या हस्ते सत्कार केला व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .तसेच विविध प्रकारचे फनी गेम्स घेऊन व उल्लेखनीय शिक्षण श्रेञात कामगिरी करणाऱ्या महिला शिक्षक भगिनीचे सन्मान सत्कार करण्यात आला..उपक्रम शील शिक्षिका सुशिला बनसोडे यांनी महिला दिनानिमित्त कविता सादर केली .
या कार्यक्रमासाठी म्हसवड मतदारसंघातील महिला शिक्षिका भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..रांगोळी किरण बोराटे सर व बोराटे मॅडम यांनी काढली. सुञसंचलन सुनिता मोरे यांनी केले व आभार सुजाता कुंभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!