हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी सौ. बी.एस.माने मॅडम.श्री दत्त जयंती मुहूर्तावर पदभार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.


वडूज प्रतिनिधी-विनोद लोहार
दि.4 – वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या 27 व्या प्राचार्य तथा मुख्याध्यापक पदी सौ. बी.एस.माने मॅडम यांची नियुक्ती दि.4 डिसेंबर,श्री दत्त जयंती चे औचित्य साधून करण्यात आली.यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री.संतोष कांबळे यांच्या हस्ते त्यांना पदग्रहण आदेश प्रदान करण्यात आला.
या वेळी चेअरमन गोविंद भंडारे,उपाध्यक्ष विजय म्हामणे,सचिव सचिन काळे,वरिष्ठ संस्था विश्वस्त विश्वासराव काळे,सतीश शेटे, सुभाष येवले, डॉ.हेमंत पेठे, अशोक भंडारे,प्रशांत शेटे, गजानन शेटे,संजय येवले, शैलेंद्र देशपांडे,नितीन जाधव,डी. सी.पंडित,श्रीकृष्ण पेठे हे हजर होते.यावेळी पर्यवेक्षक जे. टी. धुळप व सौ.एस.पी.जोशी मॅडम यांना पण नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
या नंतर श्री दत्त जयंती निमित्त ज्येष्ठ विश्वस्त व नूतन पदाधिकारी यांच्या हस्ते श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात येवून,शाळा संकुलात असलेल्या श्री औदुंबर वृक्ष स्थानाची पूजा करण्यात येवून महाआरती करण्यात आली.त्या नंतर सर्वांना गोड प्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. के. जे.कांबळे सर,समालोचन श्री.आर.एस.जगदाळे सर यांनी केले.या वेळी ज्येष्ठ शिक्षिका एस. एच.काळे मॅडम, ए. के.माने सर , पर्यवेक्षिका सौ.एस.पी.जोशी मॅडम यांनी आपली शिक्षक मनोगते व्यक्त केली.संस्था विश्वस्त सतीश शेटे , चेअरमन गोविंद भंडारे यांनी संस्था मनोगते व्यक्त केली. प्राचार्या बी.एस.माने मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त करून,संस्थेने दिलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने पार पाडणार असल्याचे सांगितले.
यावेळी म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल शिंदे मॅडम व त्यांचा स्टाफ,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.एस. जी. तिवाटणे व सर्व स्टाफ , शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ क्लार्क विजय खुडे व सर्व स्टाफ यांच्या वतीने नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *