मायणी (प्रतिनिधी ) रमजान ईदच्या २७व्या रोजानिमित्त मायणी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या सर्व मशिदीमध्ये मायणी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष जालिंदरशेठ माळी यांच्यातर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले. जालिंदर माळी हे गेली ३५ वर्षापासून २७वा रोजा दरवर्षी करतात. राम व रहीम हे एकच आहेत अशी त्यांची भावना आहे. मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ना.जयकुमार गोरे,माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर आदि मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मुस्लिम बांधवांनी जालिंदर माळी यांना धन्यवाद दिले. भारतीय जनता पार्टीमध्ये धर्मभेद व जातीभेद मानला जात नाही हेच यावरुन दिसून येते. – Post navigation महादेव लामजने यांचे कुटुंबियांना १०लाख रुपयांचा धनादेश सुयोग्य शैक्षणिक नियोजन यशाचा पाया-कृषिरत्न विश्वंभर बाबर