म्हसवड वार्ताहर

म्हसवड शहरांमध्ये भारत गॅस कंपनी तर्फे सुरक्षित आणि सुरळीत गॅस पुरवठा सुरू असल्याची माहिती शुभम भारत गॅस कंपनीचे संचालक इंजिनिअर सुनील पोरे यांनी दिलेली आहे
इराण व इजरायल युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत असताना म्हसवड मध्ये मात्र सुरळीत गॅस वितरण सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. या युद्धाच्या दरम्यान कमर्शियल गॅस वितरण बंद करण्यात आले आहे यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत असून घरगुती गॅस मध्ये कुठेही अडचण निर्माण झालेली नाही.


अशी माहिती देण्यात येत आहे सातारा जिल्हाधिकारी पाटील व मान तहसीलदार विकास अहिरे यांनी याबाबत ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
गॅस पुरवठा घरगुती व्यवस्थितपणे सुरू असून सातारा जिल्ह्यामध्ये सुरळीतपणे गॅस पुरवठा चालू आहे यामुळे लोकांनी भावनिक न होता सहकार्य करावे.य घरगुती गॅस पुरवठा व्यवस्थितपणे सुरू असल्यामुळे घाई गडबड करू नये व गॅस गर्दी न करता नंबर प्रमाणे गॅस घेण्यात यावेत.
असे या वेळेला संबंधित विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे
माण तालुक्यातील घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असून कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार या परिसरात घडल्याचे वृत्त नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!