पंढरपूर प्रतिनिधी


श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर प्रशालेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या वर्गाने बाल सभेतून नारीशक्तीचा गौरव केला. संस्थापक सचिवा मा.सौ.सुनेत्राताई पवार सो.यांच्या संकल्पनेतून विशेष बालसभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सातवीची विद्यार्थी प्रतिनिधी कु.अनुष्का आटकळे ही होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.प्रतिभा गाडे व सौ.माधुरी भोसले तसेच मुख्याध्यापक संतोष कवडे सर हे होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यामध्ये कर्तुत्वान, धाडसी महिलांची भूमिका सादर केली. राष्ट्रमाता जिजाऊ कु. वैभवी म्हमाने, अहिल्याआई कु. श्रावणी उराडे, सावित्रीमाता कु. स्वरांजली लांब, महाराणी ताराबाई कु. स्वराली जगताप, इंदिरा गांधी कु. समृद्धी वाघमारे, रमाई आंबेडकर कु. प्रणिती गाडे.
विद्यार्थ्यांनी बालसभेत नृत्यासह कविताचे सादरीकरण केले . गमतीशीर उखाणे कु. प्रणिती गाडी, शब्दकोडी कु. वैभवी म्हमाने, प्रश्नमंजुषा चि. विक्रांत भोसले व सोहम रितुंड यांनी सादर केले. मुलींनी “शिवकन्या, धूळपेरणी ” या गाण्यात नृत्य सादर केली. तर मुलांनी “गलती से मिस्टेक,नाखवादादा “या गीतावर नृत्य केले. सर्वात शेवटी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी रॅम्प वॉक करून कार्यक्रमाची सांगता केली.
भाषणामध्ये मुख्याध्यापक संतोष कवडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व जागतिक महिला दिनाच्या निमित्त आठवडाभरातील कार्यक्रमाची माहिती दिली. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ.प्रतिभा गाडेताई व सौ. माधुरी भोसलेताई यांनी मुलींना,महिलांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष कु. अनुष्का आटकळे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरण बद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सई रणदिवे व चि. सुमित वसेकर यांनी केले. आभार कु. स्वरांजली लांब हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी व वर्गशिक्षक महेश भोसले सर यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!