साताऱ्यात आज शनिवारी कृषी महोत्सव, 4 वाजता धुराळा उडणार…

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा शहरात नवीन प्रशासन भवनच्या समोर गेल्या आठवड्यात पौष्टिक कडधान्य प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला होता. आज शनिवार दिनांक ७ मार्च ते सोमवार ९ मार्च २०२६ या कालावधीमध्ये कृषी महोत्सव शुभारंभ होत असून चार वाजता त्याचा धुराळा उडणार आहे. ग्रामीण भागात चांगल्या कामाचा धुराळा उडणार अशी बोलीभाषा आहे त्याचबरोबर मैदानातही धुराळा उडणार आहे. हे लक्षात आणून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना विभागीय प्रदर्शन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्यमहोत्सव सन २०२५-२६ अंतर्गत दि. ७ ते ९ मार्च २०२६ सकाळी १० ते सायं. ८ पर्यंत सातारा पोलीस कवायत मैदान, पारंगे चौक,प्रशासकिय इमारती शेजारी, सातारा. या ठिकाणी भरवण्यात आली आहे स्टॉलची उभारणी झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातून ३०० स्टॉलची सुसज्ज उभारणी झाली आहे. या महोत्सवाची जोरदार तयारी केली असली तरी कडक उन्हामध्ये सावली निर्माण केली आहे. पण, सातारा पोलीस कवायत मैदानावरील मातीचा धुराळा चार वाजता उडणार आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे सकाळी या महोत्सवासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये बळीराजाला खुश करण्यासाठी दोन लाखापर्यंत चे पीक कर्ज माफ पायाभूत सुविधांना मुक्त असते निधी देण्यात आला आहे . तरी या साताऱ्यातील कृषी महोत्सवाला उडणाऱ्या धुराळाबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे शेतकरी संघटनेचे बाळकृष्ण चव्हाण, धन्यकुमार जाधव व क्रांतिसिंह नाना पाटील संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील यांनी सांगितले.
कृषी महोत्सव तथा कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे- पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. सर्वजण कौतुकास पात्र आहेत. सातारा नगरपालिकेच्या वतीने सदर मैदानावर पाणी मारल्यास धुराळा उडणार नाही. फक्त उद्घाटनाचाच कार्यक्रमाचा धुराळा उडावा. अशी अपेक्षा आहे.

    कृषी प्रदर्शन तथा महोत्सवासाठी श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंह भोसले हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत.सातारा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. 

उद्योजकांसाठी मार्गदर्शन म्हणून श्री. सुनिल महागंडे हे आखाती देशातील बाजारपेठ व निर्यात संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा प्राध्यापक श्री पांडुरंग धुरे हे अन्नपदार्थातील पोषणमूल्य व अन्न भेसळ ओळखणे तसेच श्री. सागर धनसिंग जाधव हे कांदा व हळद निर्यात आणि श्री. संतोष दिनकर बोबडे हे आरोग्य धनसंपदा महत्व व सोशल मिडीया द्वारे धान्याची विक्री याबाबत माहिती देणार आहेत. या महोत्सवाला सातारा जिल्ह्यासह तर भागातील शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कृषी महोत्सवामध्ये पोलीस कवायत मैदानावर वारा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराळा उडत असून शेतकरी वर्ग व ग्राहक यांना सुद्धा त्याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांशी मातीशी नाळ असते. परंतु मोठ्या प्रमाणात या धुराळामुळे कृषी महोत्सवाच्या ठिकाणी प्रदूषण होत आहे . साताऱ्यातील नवीन प्रशासन भवन च्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कृषी विभागाच्यावर असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत दखल घ्यावी. असे वाटत नसल्याने खऱ्या अर्थाने नियंत्रणाचा दुष्काळ असल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. याबाबत अनेक आणि नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई व जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


फोटो –सातारा पोलीस कवायत मैदानात कृषी महोत्सव आणि धुराळा (छाया– अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!