जागतिक महिला दिना निमित्त वडूज येथे 6 मार्च रोजी महाराष्ट्राचे हास्यवीर विशेष कार्यक्रम,

वडूज प्रतिनिधी …

ताज्या बातम्या:
जागतिक महिला दिना निमित्त वडूज येथे 6 मार्च रोजी महाराष्ट्राचे हास्यवीर विशेष कार्यक्रम,


वडूज .प्रतिनिधी विनोद लोहार
वडूज महिलांच्या सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करणारा महिला दिन जागतीक उत्सव आहे . या दिनाचे औचित्य साधुन शुक्रवारी सायकांळी सहा वाजता महाराष्ट्राचे हास्यवीर यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सौ सोनिया गोरे यांनी दिली .
वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात खटाव तालुक्यातील कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलत होत्या . यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर , प्रा बंडा गोडसे , खटाव तालुका भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माळी , नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे , जि. प सदस्य सूरज पाटील, गणेश गोडसे,विष्णू आवळे, व पदाधिकारी यांची उपस्थिती होती .
याप्रसंगी माजी आमदार दिलीपराव येळगावकर म्हणाले की , महिला सक्षमीकरण, सुरक्षा , आणि समानतेवर भर देत या दिवशी महिलांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे याच्या कल्पकतेतुन खटाव – माण तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमास बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सोमनाथ भोसले यानी केले तर आभार नंदकुमार मोरे यांनी मानले . यावेळी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती

ताज्या बातम्या: वडूज येथे 6 मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त महाराष्ट्राचे हास्यवीर विशेष कार्यक्रम,

ठिकाण .. .वडूज.एस टी डेपो पाठीमागे पेडगाव रोड .

महिलांना मार्गदर्शन करताना सौ सोनिया गोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!