मायणी( प्रतिनिधी) मायणी येथील साहित्यिक बाळासाहेब कांबळे यांनी लिहिलेल्या सातारा जिल्ह्यांच्या दुर्गम आणि डोंगर परिसरावर लिहिलेल्या कादंबरीचा सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा बी ए भाग तीन मायनर मराठी या वर्गाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे ही मायणीसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे याबद्दल खटाव तालुक्याची माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या शुभहस्ते व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर विकास देशमुख, राजाराम कचरे, महादेव ढवळे तसेच शुभम माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते Post navigation क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे दातृत्व….अपघात ग्रस्त पालकाला मदतीचा हात. अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालणारा देवभाऊंचा पायाभूत अर्थसंकल्प – राजा माने