(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात नवीन प्रशासन भवनच्या समोर गेल्या आठवड्यात पौष्टिक कडधान्य प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला . आता शनिवार दिनांक ७ मार्च ते सोमवार ९ मार्च २०२६ या कालावधीमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या शेतीमालाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री होणार आहे. या कृषी महोत्सव तथा प्रदर्शनाला अनेक मान्यवर भेटी देणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना विभागीय प्रदर्शन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्यमहोत्सव सन २०२५-२६ अंतर्गत दि. ७ ते ९ मार्च २०२६ सकाळी १० ते सायं. ८ पर्यंत सातारा पोलीस कवायत मैदान, पारंगे चौक,प्रशासकिय इमारती शेजारी, सातारा. या ठिकाणी भरणार आहे.कृषी महोत्सव तथा कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे- पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी करत आहेत.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना उत्पादनांचे थेट मोठ्या खरेदीदारांसमोर सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नवीन व्यवसाय संधी आणि निर्यात प्रक्रियेबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी वअन्न प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व स्वच्छतेच्या मानकांविषयी माहिती मिळणार आहे.हे संमेलन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठीआणि थेट खरेदी विक्रीचे करार करण्यासाठी महत्वपुर्ण व्यासपीठ ठरणार आहे.कृषी प्रदर्शन तथा महोत्सवासाठी श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंह भोसले हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत.सातारा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.उद्योजकांसाठी मार्गदर्शन म्हणून श्री. सुनिल महागंडे हे आखाती देशातील बाजारपेठ व निर्यात संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा प्राध्यापक श्री पांडुरंग धुरे हे अन्नपदार्थातील पोषणमूल्य व अन्न भेसळ ओळखणे तसेच श्री. सागर धनसिंग जाधव हे कांदा व हळद निर्यात आणि श्री. संतोष दिनकर बोबडे हे आरोग्य धनसंपदा महत्व व सोशल मिडीया द्वारे धान्याची विक्री याबाबत माहिती देणार आहेत. या महोत्सवाला सातारा जिल्ह्यासह तर भागातील शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Post navigation पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती जागतिक महिला दिना निमित्त वडूज येथे 6 मार्च रोजी महाराष्ट्राचे हास्यवीर विशेष कार्यक्रम,