बिदाल प्रतिनिधी दि
धुळदेव (ता माण ) गावाचा उपसरपंच पदी विलास राजाराम कोळेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले. उपसरपंच हे भाजप पक्षाच्या माध्यमातून काम करणार आहेत.
यावेळी सरपंच सौ राणी दुर्योधन कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य दादासो शिंगाडे, दत्तात्रय कोळेकर, सौ चंद्रभागा कोळेकर, सौ छाया अहिवळे,सौ सत्वशीला कोळेकर, सौ सीना कोळेकर व ग्रामपंचायत अधिकारी बापू काळेल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच विलास कोळेकर बोलताना म्हणाले गावाच्या विकासासाठी काम करणार आहे. गावातील महिलांना रोजगार मिळावा व बचत गट सक्षमीकरण व्हावे यासाठी क्षण देखील घेणार आहे. गावामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती तयारी करण्यासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके वाटप करणार आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तरुणांना व्यायामशाळा बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्वच्छतेची मोहीम राबवणार आहे.
यावेळी माजी सरपंच मारुती कोळेकर, दुर्योधन कोळेकर,जयाप्पा कोळेकर ,राहुल कोळेकर, आनंदा कोळेकर, सुखदेव कोळेकर,देविदास कोळेकर, शामराव कोळेकर, विश्वास कोळेकर,सुनील कोळेकर,पंजाब कोळेकर, बबन ढवळे, व ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो ओळी
धुळदेव येथे उपसरपंच विलास कोळेकर यांचा सत्कार करताना (छायाचित्र आकाश दडस)
