बिदाल (प्रतिनिधी):शेवरी विकास सेवा सोसायटीचे ज्येष्ठ विद्यमान संचालक आणि परिसरातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व अ‍ॅड. विजयराव बळवंत हिरवे (दादा) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शेवरी परिसरासह सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अ‍ॅड. विजयराव हिरवे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेवरी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यशस्वीपणे काम केले होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. एक अभ्यासू, कायदेतज्ज्ञ आणि अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत मोठी ओळख होती.

समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. शेवरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “एका अनुभवी आणि अभ्यासू मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हिरवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!