सातारा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समिती ही सर्व धर्म समभाव, सामाजिक ऐक्य व शैक्षणिक जागृतीच्या धरतीवर काम करणारी आहे.मी संविधानावर जगत असून संविधानावरच उभी आहे.असे विचार समितीच्या अध्यक्षा डॉ.पल्लवी साठे-पाटोळे यांनी मांडले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सांस्कृतिक सभागृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समातोहाची महत्वपूर्ण सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा डॉ.पल्लवी साठे-पाटोळे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, “जयंती समितीमध्ये प्रत्येक जण आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला वैचारिक मत मांडण्याचा अधिकार आहे. स्त्री-पुरुष असला भेदभाव नाही. मी श्रेष्ठ, मी जुना कार्यकर्ता असा अहंभाव नाही. आपल्या समितीला ज्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते. ते शिव, शाहू ,फुले ,आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचे पाईक आहेत. आज महाराष्ट्रात आपल्या जाती जातीत जो तेढ निर्माण करू इच्छितात.त्यांच्यासाठी आपण सर्व जाती-धर्माला एकत्र घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणार आहोत. महाराष्ट्राला एकोप्याचा आदर्श देत आहोत. वैज्ञानिक, वैचारिक भूमिका मांडत सलोख्याने पुढे जात आहोत. पण काही मनुवादी विचारांची लोकं तेढ निर्माण करू पाहत आहेत. कारण त्यांना उच्चशिक्षित डॉक्टर महिला अध्यक्षपद भूषवित आहे. हे पचनी पडत नाही.महिलांना ५० टक्के आरक्षण फक्त कागदावरच आहे का ? या गोष्टीला तडा देत जर आपण एक महिला प्रतिनिधी काम करण्यास पुढे येत असेल तर ही लोकं त्याला विरोध करतात. मग हे चळवळ चालवणारे so called नेते कसले ? ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊनी डॉ. बाबासाहेबांना गुरु मानले. अशा क्रांतिकारी महामानवांचे विचार जोपासण्यापेक्षा त्यांना त्यांच्याच घाणीत गुटमळायचे आहे. आपल्या समितीचा पायाच जर पारदर्शकतेचा असेल, आपण एका विचाराने, एका मताने, एकमेकांना आदर देतच सामाजिक बांधिलकीने एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित येत असू तर त्यांना कसे पचनी पडेल ? असो.सातारा जिल्हा हा क्रांतिकारी चळवळीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले व राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई ,सावित्रीमाई, राजमाता ताराराणी यांच्या कणखर क्रांतीने घडलेला आहे. आणि तोच आदर्श घेत आपण त्यांची क्रांतिकारी लेकरं एकासाथीने आपल्या महामानवांची जयंती साजरी करूया.शेवटी विरोधकांमुळेच आपल्याला चालना मिळते. त्यांच्या विरोधाचे आपण स्वागतच करूया.”यावेळी मार्गदर्शकासह विस्तारीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करून सर्व ठराव सर्वसंमत झाले. सदरच्या सभेत दि.१ ऑगष्ट रोजी अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने साजरी करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले.मातंग, बौद्ध,ढोर,चर्मकार आदी बहुजनांनी एकत्रित येऊन वर्षभर विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. उपवर्गीकरणबाबत राज्याचा विचार न करता सातारा जिल्ह्याचाच विचार करून ऐक्य राखले पाहिजे.सातारा हा आंबेडकरवाद्यांचा एकसंघ असणारा पॅटर्न राज्यामध्ये आदर्शवत असल्याचा अभिमान मान्यवरांनी व्यक्त केला. झोपेचे सोंग घेऊन फिरणाऱ्या कार्यकात्याकडे दुर्लक्ष्य करण्याचेही एकमताने ठरविण्यात आले. आपलीच बहुमताने निर्माण केलेली अधिकृत समिती असल्याने नियोजनबद्ध व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करायची आहे.पक्ष विरहित समिती असल्याने सर्वांचे स्थान सारखेच आहे.अशा अनेक बाबीवर सार्वजनिक चर्चा करून उशिरा चाललेली सहविचार सभा संपविण्यात आली.यावेळी अशोकबापू गायकवाड, संजयतात्या गाडे,दादासाहेब ओव्हाळ, गणेश भिसे,संदीप कांबळे, अमोल पाटोळे,दीपक चव्हाण,गौरी आवळे,सतीश गाडे,मदन खंकाल,रामभाऊ मदाळे,वैभव गायकवाड, आदित्य गायकवाड,प्रतीक गायकवाड,आप्पा तुपे, एकनाथ रोकडे,अरुण पवार,संदीप जाधव (मावळा),विशालभाऊ कांबळे, आशुतोष वाघमोडे, सुरेश मुळीक,ऍड.विलास वहागावकर,रामदास वाघमारे, अनिल वीर आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य महिला उपस्थित होत्या. फोटो : मार्गदर्शन करताना डॉ.पल्लवी साठे शेजारी मान्यवर. Post navigation डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप