( अजित जगताप)
तापोळा दि: महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या गावी ते खाजगी दौऱ्यानिमित्त अमावस्या च्या दोन दिवसानंतर येतात . मुख्यमंत्री गावाला भेटीला आल्याचे समजतात अनेक जण धाव घेतात.
पण, अमावस्या नंतर दोन दिवसांनी आलेल्या उपमुख्यमंत्री शेतात रमल्यामुळे शेतकरी संघटनेच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेट न घेता हात हलवत परतावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याची आता चर्चा चांगलीच जोर धरू लागलेली आहे.दरम्यान , दरेतांब गावात उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती यांनी शेतकरी संघटनेची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.
त्यांना दिलासा दिला आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेने प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
याबाबत माहिती अशी की, राज्याचे मुख्यमंत्रीपद प्राप्त झाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव चांगलेच प्रकाश झोतात आले होते .त्यांच्या प्रतिमेचा फायदा घेण्यासाठी अनेकजण धाव घेत आहेत.
शासकीय पातळीवर प्रोटोकॉल असल्यामुळे अधिकारी वर्गांना हजर राहणे क्रमप्राप्त असले तरी काही माध्यमांनी तर मुख्यमंत्र्यांची शेती हाच विषय चांगलाच लावून धरला. देशी- विदेशी वाण पाहण्यात त्यांनी धन्यता मानली. पण, सातारा जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन घेऊन येणाऱ्या अनेकांना मात्र भेट नाकारली गेली आहे. त्यामुळे ही बाजू सुद्धा माध्यमांनी प्रकाशित केली आहे.
शनिवारी दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी
शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन दरे तांब गाव गाठले होते .मोठ्या आशेने लाँच व नंतर पायपीट करून उपमुख्यमंत्र्यांचा बंगला गाठला. पण, त्या ठिकाणी अगोदरच ठिय्या देऊन बसलेल्या टोळक्यांमुळे त्यांच्या भेटता आले नाही. अखेर नवनिर्वाचित शिवसेनेचे सदस्य व उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय संजय मोरे यांनी शेतकरी संघटनेचे निवेदन घेऊन ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द दिला. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या व्यक्तिगत प्रश्नांसाठी दरे तांब गावी आले होते.
त्यांची ही भेट झाली नाही.
दरे तांब गावात उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी दौऱ्यात पूर्वीसारखी गर्दी होत नाही. ही वस्तुस्थिती असूनही लोक मोठ्या आशेने निवेदन घेऊन येतात. पण, त्यांची भेट होत नाही. याबाबत आता धोरणात्मक निर्णय उपमुख्यमंत्र्यांनीच घ्यावा.
अशी मागणी पुढे आलेली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खाजगी दौरा असला तरी शासकीय यंत्रणा कार्यरत असते. त्यामुळे सामान्य माणसांना प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. सामान्य माणसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कशी खेती करतात ? हे बघायला येत नसून आपले प्रश्न घेऊन येतात. हे आता कुणीतरी ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.
सामान्य माणसांना दिलासा देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तम शेती करतात. त्याबद्दल त्यांचे आभारी आहे .परंतु ,शेतकऱ्यांचे प्रश्न स्ट्रॉबेरी इतकेच त्यांनी महत्वाचे मानून बघावे.अशी मागणी शेतकरी संघटनेचे धन्यकुमार जाधव, विजय पाटील, नवनाथ कदम व माण , फलटण, कोरेगाव, कराड,खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो- उपमुख्यमंत्र्यांच्या दरे तांब गावात शेती करताना एकनाथ शिंदे व निवेदन देणारे शेतकरी संघटनेचे शेतकरी
