म्हसवड वार्ताहर
माहे जानेवारी 2026 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाणे ठरले सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन






विविध उत्कृष्ट कामगिरीबद्दल तब्बल 4 पुरस्कार प्राप्त
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमची उत्कृष्ट कामगिरी सुरूच
सविस्तर हकीकत
*सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कामकाज करताना जी जनतेच्या हितासाठी, आणि महिलांच्या सुरक्षेकरिता कामे करणे अपेक्षित आहे आणि ही कामे करताना जे पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना प्रत्येक महिन्याला क्राईम कॉन्फरन्स मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येत असते.
माहे जानेवारी 2026 या महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त शाळा, महाविद्यालय या ठिकाणी भेट देऊन मुलींची छेडछाड होऊ नये त्याचबरोबर एखादा चुकीचा प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच गुड टच, बॅड टच या गोष्टींचे मार्गदर्शन, शाळा महाविद्यालय भेटी व रोड रोमियो वरील कारवाई या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळालेला आहे. तसेच महिलांविरोधातील घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या 24 तासात पूर्ण करून सर्व पुरावे गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केल्याबद्दल व ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलेले आहे. तसेच नॉन बेलेबल वॉरंट मधील तब्बल पंधरा आरोपींना अटक करून जिल्ह्यात सर्वात जास्त आरोपी अटक केल्याबद्दल व त्यांना माननीय न्यायालयात हजर केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री तुषार दोशी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. म्हसवड पोलीस ठाणे अशा पद्धतीने विविध कामकाजाच्या अनुषंगाने पुरस्कार घेणारे पोलीस स्टेशन असून प्रत्येक महिन्यात होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्स मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे.*
प्राप्त पुरस्कारांची माहिती खालील प्रमाणे
1) सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार
2) महिला अत्याचाराचे दोषारोप पत्र 24 तासात सबळ पुरावा प्राप्त करून माननीय न्यायालयात हजर केल्याबद्दल पुरस्कार
3) नॉन बेलेबल वॉरंट मधील 15 आरोपींना अटक केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट एन बी डब्ल्यू वॉरंट बजवणी पुरस्कार
*4) पीडित महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याबद्दल दाखल असलेल्या गुन्ह्यात तात्काळ तपास करून 24 तासात दोषारोप पत्र जमा केल्याबद्दल पुरस्कार मिळाले आहेत
सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, भगवान सजगणे , राजेंद्र कुंभार , राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल, ज्योती सरगर यांनी केलेली आहे..
