म्हसवड – सुशिल त्रिगुणे… म्हसवड शहराच्या लोकनियुक्त विद्यमान नगराध्यक्षा सौ.पूजा सचिन (लक्ष्मण) विरकर यांनी आज म्हसवड शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आमचे मार्गदर्शक ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून म्हसवड शहरातील अनेक विविध विकासकामांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या निधीमधून म्हसवड शहरातील अनेक विविध विकासकामे प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसांत ती कामे पूर्ण होऊन म्हसवड शहराच्या विकासात भर घालणार असून त्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी नगराध्यक्ष सौ. पूजा विरकर यांनी केली. माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून म्हसवड शहर आणि परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध व दर्जेदार विकास हाच मुख्य उद्देश आहे. विकासकामं वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पूर्ण व्हावीत, यासाठी म्हसवड शहराच्या लोकनियुक्त विद्यमान नगराध्यक्षा सौ.पूजा सचिन (लक्ष्मण) विरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना केल्या. यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदार, म्हसवड नगरपालिका कर्मचारी आणि युवानेते सचिन (लक्ष्मण) वीरकर, शुभम लिंगे यावेळी उपस्थित होते. Post navigation उपमुख्यमंत्री गावी शेतीत रमल्याने शेतकरी संघटनेला हात हलवत परतावे लागले. ओमकार रानडे याची ” इंजिन कॅडेट ” पदी निवड