दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
येळेवाडी (ता. माण)
येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील हिराई साहित्यनगरीत मंगळवारी (ता. २४) पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष एम. डी. दडस यांनी दिली.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते आणि संमेलनाध्यक्ष, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त रुक्मिणी गलांडे, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, संत गाडगेबाबा
मिशनचे संचालक शिवाजी महानवर, राज्य कर उपायुक्त मुंबई डॉ. प्रमोद भोसले उपस्थित राहणार आहेत. विशेष कथाकथन हेडाम कादंबरीचे लेखक नागू वीरकर, राजनंदिनी पडर यांचे असणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार भूषण पुरस्कार बापूराव गुंजवटे, वैद्यकीय सेवारत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, आदर्श राजकीय नेता पुरस्कार अर्जुन काळे, साहित्यिक पुरस्कार अॅड. संजन मोरे, शिक्षणरत्न पुरस्कार आर. एस. चोपडे, अध्यात्मिकरत्न पुरस्कार हभप सुरेश महाराज सूळ, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समाजसेवक दत्तामामा
जगदाळे, युवा उद्योजक सागर घोरपडे, प्रगतशील शेतकरी नितीन तावरे, डिजिटल पत्रकारभूषण पुरस्कार लिंगराज साखरे व सचिन शिंगाडे, युवा अधिकारी राजेंद्र भोसले, क्रीडारत्न कशिश सिकंदर शेख या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी हनुमंत चांदगुडे, तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के यांची असणार आहे. यामध्ये चंद्रकांत चाबुकस्वार, बाबासाहेब कोकरे, सोमनाथ सुतार, मनीषा मिसाळ, अविनाश चव्हाण, प्रमोद जगताप, युवराज खलाटे, संजय मोरे, दादासाहेब भोसले, मोहसीन आतार, आशाताई
दळवी, रंजना सानप हे कवी सहभाग होणार आहेत.
या ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष एम. डी. दडस कार्याध्यक्ष दादाराजे भोसले, कार्यवाहक जयराम शिंदे, संयोजक मृणालिनी एमा हे आहेत, तर संयोजक समितीमध्य अध्यक्ष वैभव महानवर, उपाध्यक्ष हभप प्रतीक भोसले, कोषाध्यक्ष अमित भोसले, कार्याध्यक्ष मामूशेव वीरकर, सहसचिव बाळासाहेब बरकडे उपाध्यक्ष के. एस. तांबे, सहकार्यवा डॉ. अंकुश बरकडे, सचिव लक्ष्मण महानवर आहेत. या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अस आवाहनही स्वागताध्यक्ष एम. डी. दडस यांनी केले आहे.
