सातारा वृत्तसेवा
1 लया महाराष्ट् देश ग्रामिण साहित्य संमेन येत्या 24 फेब्रुवारी2026 ला येळेवाडी ता. माण येथे पी. एम.डी. उद्योग समूह वं एम. डी. दडस सर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने येथे आयोजन केले असून.. माण देशी बोली भाषेवर लिहीलेल्या हेडाम या बहुचर्चीत कादंबरीचे लेखक नागू विरकर आपली ग्रामिण कथाकथन सादर करणार आहेत. या वर्षीच्या दिवाळी अंकात माण देशी न्यूज ने त्यांची तारांबळ हीं कथा प्रकाशित केली होती. वाचक वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळाला… आत्ता तीच कथा त्यांच्या तोंडून येळेवाडी येथील साहित्य सम्मेलनात ऐकायला मिळणार आहे हीं माणच्या साहित्य रशिक प्राध्यापक त्यांचासाठी मोठी परवानी आहे कादंबरीचे नाव देश विदेशात झाले असून सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठात बी. ए. भाग-2 ला गतवर्षा पासून अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
नागू विरकर हे म्हसवड जवळील मसाईवाडी गावचे मूळ राहिवाशी असून त्यांचं शिक्षण माण तालुक्यात रयत शिक्षण संस्थेत झाले आहे. सद्या ते ठाणे जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असून कल्याण येथे वास्तव्यास आहेत
विरकर साहेबानंची माण देशी बोली भाषेवर प्रचंड पक्कड असून त्यांनी अनेक ठिकाणी कथाकथन सादर केले आहेत. गेल्यावर्षी त्यांची कथाकथनास विश्व साहित्य संमेलनात दुबई या प्रगत राष्ट्रात निवड झालीं होती जगभरातून आलेल्या साहित्यकान समोरही त्यांनी माण देशी बोली भाषेत कथा सादर केली होती तिला उदंड प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद लागला होता. ती कथा एकूण त्यांना ऑस्ट्रेलियातील जग प्रसिद्धी गिफ्ट-युनिव्हरसिटी चा पुरस्कार मिळाला असून.. मलेशियातील ऑरेंज वर्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचे नोमनेशन झाले आहे.विश्व शांती दूत सुधीर तारे साहेब 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेनाचे अध्यक्ष पानिपतकांर विश्वास पाटील, कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या प्रस्तावना रुपी आशीर्वाद त्यांना लाभले आहेत.
माणदेशी ग्रामिण साहित्यिक म्हणून व्यकटेश माडगूळकर, शंकराव खरात, द. मा. मिरसदार या जेष्ठ गजलेल्या लेखकांनी जगातिक स्तरावर मांण देशी भाषेला सन्मान मिळवून दिला आहे.. त्याच धर्तीवर नागू विरकर यांचे साहित्य वाटचाल करत असून देश विदेश महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या बरोबरच कुं. राजनंदानी पडर हीं प्रसिद्ध कथाकार कथा सादर करणार आहे.
संमेलन अध्यक्ष मा. रवींद्र कोकरे सर,जेष्ठ साहित्यिक एम. डी. दडस सर,विकांस सामाजिक संस्था अध्यक्ष उदघाटक जेष्ठ पत्रकार मा. अरविंद महेता सर आदी मान्यवारणी या निवडी बदल अभिनंदन केले आहे. कथाकथन एकण्यासाठी अनेक साहित्य रशिक उपस्थित रहाणार असून.. या साहित्य संमेलणाचा आस्वाद सर्वानी घ्यावा असे आव्हान अध्यक्ष यांनी केले आहे
राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात रंगणार नागू विरकर यांचे कथाकथन..
