सातारा जिल्ह्यात दोस्तीच्या दुनियेत निभावला व्हॅलेंटाईन डे..


(अजित जगताप)
गोंदवले दि: दरवर्षी १४ फेब्रुवारी म्हणजे जगभर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मित्र व मैत्रिणीच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या याच दिवशी सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुक्यात मित्राचा फोटो आपल्या हातावर गोंदणाऱ्या एका मित्राने खऱ्या अर्थाने मैत्रीचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुष्काळी भाग समजणाऱ्या माण – खटाव तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणारे हिरे रत्ने आहेत. त्यामध्ये आता मैत्री जपणाऱ्या माणुसकीमुळे सुद्धा एक आगळावेगळा विक्रम केला आहे. पिंगळी तालुका माण येथील काचेच्या खिडक्याचे काम करणाऱ्या विकी तोरसे पाटील यांनी आपला गुरसाळे तालुका खटाव येथील मित्र सौरभ जाधव यांच्या मैत्रीपूर्ण प्रेमापोटी श्री जाधव यांचा आपल्या उजव्या हातावर फोटो गोंदून घेतला आहे. चार तासाच्या परिश्रमानंतर आपल्या मित्राला ही कलाकृती दाखवण्यात आली. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
निखिल अवघडे या कलावंतांनी सुमारे चार तासाच्या परिश्रमानंतर हा हुबेहूब फोटो हातावर गोंदला आहे. त्या कलाकृतीलाही अनेकांनी चांगलीच दाद दिली आहे.
वास्तविक पाहता नट- नटी व देवता आणि इतर अक्षरे हातावर गोंदण्याची तरुण पिढीची फॅशन आहे. या फॅशनमुळे आयुष्यभर आपल्या सोबत शरीरावर गोंदलेली कलाकृती असावी. असा प्रत्येकाला वाटते. शेवटी फॅशनच्या दुनियेत सर्वकाही माफ असते. परंतु, आपल्या निस्वार्थी भावनेतून निर्माण झालेल्या दोस्ती कायम निभावली पाहिजे. या एका बंधनाने विकी तोरसे पाटील यांनी आपल्या हातावर श्री. सौरभ जाधव यांचा फोटो गोंदला आहे. एकमेकांच्या स्वभाव पटल्यानंतर रॉयल कारभार ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त पाच वर्षांपूर्वी दोन मित्रांची भेट झाली. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगीही सावलीसारखे ते एकमेकांच्या मदतीला उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा या मैत्रीच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. तो आता शरीरावर सुद्धा प्रतिबिंबित झाला आहे. श्री सौरभ जाधव यांनी गुरसाळे ते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या रॉयल कारभार ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचे जाळे विणले आहे. त्यामध्ये अनेक युवक सक्रिय सहभागी झालेले आहेत.
सामाजिक कार्याची पोहच पावती त्यांना मित्राकडूनच मिळाली आहे. त्याचबरोबर रक्ताच्या नात्यालाही कमी वाटावं असे मैत्रीचे नाते अतूट झाले आहे. जगामध्ये मैत्री श्रेष्ठ ठरले असून व्हॅलेंटाईन डे च्या शुभमुहूर्तावर खऱ्या अर्थाने मैत्री दिन साजरा झाला आहे. शेवटी पसंत आपली आपली हेच खरे आहे. हे मात्र कोणी विसरू नये. मैत्री टिकवण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. तो या टॅटूंमुळे सिद्ध झाला आहे.


फोटो —
व्हॅलेंटाईन डे निमित्त मित्रानेच आपल्या हातावर गोंदला मित्राच्या फोटो.. (छाया– अजित जगताप, गोंदवले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *