म्हसवड वार्ताहर दि
म्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक अजित काटकर यांनी केले. ते क्रांतिवीर शॆक्षणिक संकुलातील प.पु.आत्मगिरी विद्यालयातील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी विकास प्रतिष्ठान च्या सचिव सॊ.सुलोचना बाबर होत्या यावेळी क्रांतिवीर सी बी एस सी चे प्राचार्य विन्सन जाॅन, ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, प.पु.आत्मगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अजित काटकर पुढे म्हणाले की आयुष्यात कितीही मोठे व्हा पण जन्म देणारे मातापिता पोषण करणारी माती व ज्ञानसंपन्न करणारे गुरुजन यांना कधीही विसरू नका.माण सारख्या दुष्काळी भागातील काही लोकांनी मन मनगट व मेंदूचा वापर करुन संपुर्ण भारतभर नावलॊकिक मिळवला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अनेकजण देशसेवा करीत आहेत.
आत्मविश्वास नसणारी माणसं आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत.दहावीच्या या परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जा निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बाबर मॅडम म्हणाल्या की या शॆक्षणिक संकुलात शिक्षण घेतलेली अनेक मुले मुली विविध क्षेत्रात काम करीत आहेत.आपणासमोर चांगल्या व्यक्तींचा आदर्श ठेवा व त्याच्या सारखे बनायचा प्रयत्न करा. कार्यक्रमात प्रा.विन्सन जाॅन, प्रा.विठ्ठल लवटे, भोसले सर यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गॊरवण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला तीन कार्यालयीन खुर्च्या भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले तर शॊर्या सरतापे व अनुष शेटे यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे,– लेखक अजित काटकर
