म्हसवड( प्रतिनिधी)-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजल येथे वडजल केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न झाली. स्वागत, परिपाठ आणि प्रास्ताविक सौ रोहिणी खाडे मॅडम जि. प.शाळा वडजल यांनी केले. निपुण महाराष्ट्र अभियान व मासिक चाचणी मार्गदर्शन सौ मोनिका नरळे मॅडम जि प शाळा नरबटवाडी यांनी केले.

डॉ. जयंत नारळीकर विज्ञान गणित समृद्धी कार्यक्रम मार्गदर्शन श्री पांडुरंग यादव जि प शाळा मुरूमशेंडा यांनी केले. भाषा पंधरवडा मार्गदर्शन श्री सुग्रीव नरळे जि. प.शाळा ढाकणी यांनी केले.मूल्यवर्धन प्रशिक्षण नंतरची कार्यवाही व अध्ययन निष्पत्ती वर आधारित मासिक नियोजन मार्गदर्शन श्री पुंडलिक खराडे जि. प. शाळा गटेवाडी यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती मासिक मीटिंग मार्गदर्शन सौ भाग्यश्री नलवडे जि प शाळा धुळेश्वर नगर यांनी केले ज्ञानरचनावाद कार्यशाळा याविषयी मार्गदर्शन सौ भाग्यश्री नलवडे व सौ पल्लवी नवत्रे मॅडम जि. प.शाळा घुणेवस्ती यांनी केले आभार प्रदर्शन केंद्र समन्वयक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनील महामुनी सर यांनी केले. एकंदरीत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.
छायाचित्र – सौ भाग्यश्री नलवडे ज्ञानरचनावाद मार्गदर्शन करताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!