जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी चा दणका.5 पैकी 3 जागेवर राष्ट्रवादी.

म्हसवड (वार्ताहर)—

माण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसलेला आहे
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाच पैकी दोन जागा भाजपने जिंकलेल्या असून तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माण तालुक्यातील दहा पैकी पाच जागा राष्ट्रवादी व पाच जागा भाजपने जिंकलेल्या आहेत.

राज्याचे ग्रामविकास मंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे यांना स्वतःच्याच मतदारसंघांमध्ये मोठा धक्का बसला असून त्यांचे चुलत भाऊ अरुण गोरे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे .
कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांना भाजपने उमेदवारी देण्यात आलेली होती.
येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल देसाई यांनी विजय मिळवलेला आहे.
माण तालुका जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आंधळी गटामधून भाजपच्या सोनल शेखर गोरे या विजयी झालेले आहेत अलका जगदाळे या भारतीय जनता पार्टीच्या विजय झालेल्या आहेत.

मार्डी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सोनाली पोळ या विजयी झालेले आहेत. गोंदवले जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीच्या शितल या विजयी झालेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटातून विजय झालेले आहेत.
पंचायत समिती मलवडी गणातून भाजपचे बाळकृष्ण कदम हे विजयी झालेले आहेत. आंधळी गणातून भाजपचे अर्जुन काळे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
पंचायत समिती गणातून भाजपच्या उषा भोसले या विजयी झालेले आहेत. वावरहिरे पंचायत समिती गणातून राजाराम बोराटे हे विजयी झालेले आहेत. मार्डी पंचायत समिती गणनातून प्रियांका जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस मधून विजयी झालेले आहेत. वरकुटे पंचायत समिती गण मधून कल्पना विरकर राष्ट्रवादी काँग्रेस मधून विजय झालेले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे पळशी गणातील उमेदवार राजेंद्र खाडे हे विजय झालेले आहेत गोंदवले पंचायत समिती गटांमध्ये राष्ट्रवादीच्या गौरी तुपे या विजयी झालेले आहेत कुकडवाड पंचायत समिती गणा मधून विद्या काटकर या राष्ट्रवादी मधून विजयी झालेले आहेत वरकुटे मलवडे गणातून राष्ट्रवादीचे विक्रम शिंगाडे हे विजयी झालेले आहेत.
..

नेत्याचे खरे बळ हे पदात नसून त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते.
जो नेता कार्यकर्त्याला जीवापाड जपतो, त्याला घडवतो, संधी देतो आणि संकटात साथ देतो — तोच खरा जनतेचा नेता ठरतो.

कार्यकर्त्यांना दुर्लक्ष केल्यास, त्यांचे श्रम विसरल्यास किंवा त्यांना केवळ वापरून टाकल्यास, नेत्याचे स्थान घसरायला वेळ लागत नाही.
कारण मजबूत कार्यकर्ते म्हणजे मजबूत नेतृत्वाची मुळं — आणि मुळं कमजोर झाली, तर झाड उभं राहू शकत नाही.

सारांश विचार (चार शब्दांत):
“कार्यकर्ता जपा, नेतृत्व वाचवा.”
“कार्यकर्तेच नेत्याची खरी ताकद.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *