म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर म्हसवड वृत्तसेवाम्हसवड: येथील वकील संघाच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या या निवडीमध्ये वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. अमित पोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.नूतन कार्यकारिणीत महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. सौ. स्वाती कवितके यांची निवड झाली असून, सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ॲड. प्रवीण खासबागे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच सह-सचिवपदी ॲड. सौ. कापसे मॅडम आणि खजिनदार म्हणून ॲड. सौ. जानकर मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञांकडून अभिनंदन या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या घोषणेनंतर म्हसवड न्यायालय परिसरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वकील संघातील सर्व ज्येष्ठ विधिज्ञांनी आणि सहकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. “नूतन कार्यकारिणी म्हसवड वकील संघाच्या वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी कटिबद्ध राहील,” असा विश्वास याप्रसंगी ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल संपूर्ण म्हसवड शहर व परिसरातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Post navigation स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्यात यावे,