वडूज प्रतिनिधी. विनोद लोहार▪️ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनवडूज. दि. १ : अहिंसा परमो धर्म की जय.. जिओ और जिने दो च्या जयघोषात व्यसनमुक्तीव पर्यावरण रक्षणाचा संदेश देत येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा चोवीसावावार्षिक रथोत्सव विविध कार्यक्रमांनी साजराकरण्यात आला.बुधवार दि. २८ रोजी सकाळी माणिकबाई रूपचंदशहा ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष शहा यांच्या हस्ते ध्वजारोहन व कुंभस्थापना करण्यात आली.त्यानंतर अभिषेक व त्रिकाल चौबीसी विधान कार्यक्रम झाला. गुरूवारी (दि.२९) होणारे सर्वकार्यक्रम रद्द करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शुक्रवारी(ता.३०) सकाळी अभिषेक व त्यानंतर मनोज पाटील यांचा भजनसंध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यानंतर रथोत्सव बोलीचा कार्यक्रमझाला.शनिवारी (दि.३१) सकाळी गिरीष शहायांच्या हस्ते दिपप्रज्वलन व विकल्प शहा परिवाराच्या हस्ते रथपूजन करण्यात आले.सौ.सोनाली व्होरा, श्री. मिलींद व्होरा यांना सौधर्म इंद्र व इंद्रायणीचा मान मिळाला.त्यानंतर रथ मिरवणूकीला सुरूवात करण्यातआली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रथोत्सवमिरवणूक काढण्यात आली. जिओ और जिनेदो…. अहिंसा परमो धर्म की जय, विश्वशांती कीजय.. आदी घोषणा तसेच व्यसनमुक्ती वपर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही मिरवणूककाढण्यात आली. रथोत्सव मिरवणूकीपुढे घोडेतसेच वाद्यवृंद संच होते.येथील त्यागी निवासात बांधण्यात आलेल्यासौ.स्नेहलता जवाहर शहा सभागृहाचे सुकूमारशहा, वैभव शहा,विकल्प शहा, जितेंद्र गांधी, जितेंद्र शहा, रोहीत शहा,मनिष शहा आदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रथमाचार्य शांतीसागर मुनीमहाराज ध्यान मंदिराचे मंगेश शहा, नितीन शहा, मनोज शहा (अकलूज) यांच्या हस्तेभूमीपूजन करण्यात आले.उपस्थितांना राजेंद्र शहा, डॉ.संजय शहा, नितीनगांधी, विशाल गांधी यांच्या कुटूंबियांवतीने महाप्रसाद देण्यात आला. विधानाचार्य दिनेश उपाध्ये,शितल उपाध्ये यांनी धार्मिक विधी केले.कार्यक्रमास सौ. माणिकबाई रूपचंद शहा ट्रस्टचे पदाधिकारी तसेच जिल्ह्या परजिल्ह्यांतीलसकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रविवार दि . १ रोजी श्रीमान शेठ , चंदुलाल लिलाचंद शहा , त्यागी साधना केंद्र वडूज येथे अरिहंत महिला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . अध्यक्ष मोना शहा , उपाध्यक्ष रुपाली शहा , खजिनदार मीना शहा , सेक्रेटरी सविता दोशी , नियोजन व सुत्रसंचालन अमृता व्होरा यांच्याकड़े सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी सोपवण्यात आली होती .वडूज : वडूज शहरातून जैन समाज बांधवांच्यावतीनेकाढण्यात आलेली रथोत्सव मिरवणूक २) मिलींद व्होरा व सोनाली व्होरा यांना सौधर्म इंद्र , इंद्रायणीचा रथात बसण्याचा मान मिळाला Post navigation “विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने पंढरपूरमध्ये सामाजिक समरसता यात्रा अभियानातून हिंदू सारा एक हा संदेश देण्यात आला” जिल्हा परिषद मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात आठवडा बाजार बंद