माण | प्रतिनिधीमाण तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ (मतदान दिन) व सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ (मतमोजणी दिन) रोजी माण तालुक्यातील आठवडा बाजार (आठवडे बाजार) बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार माण यांनी दिले आहेत. दिनांक 7/02/2026 रोजी पळशी, वावरहिरे, विरळी येथील बाजार बंद राहणार, व दिनांक 9 रोजी दहिवडी येथील बाजार बंद राहणार आहे. ताज्या बातम्या: जिल्हा परिषद मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात आठवडा बाजार बंद.जिल्हा परिषद मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात आठवडा बाजार बंद.. माण तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी एकूण २१७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीत पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर आदेश महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ (मार्केट अॅक्ट) च्या कलम ७(३) अन्वये देण्यात आला असून, याबाबतचे अधिकार मा. जिल्हाधिकारी, सातारा यांनी तहसीलदार माण यांना प्रदान केले आहेत. हा आदेश दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला असून, माण तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Post navigation पार्श्वनाथ दिगंबर जैन मदिरांचा २४ वा वार्षिक रथोत्सव उत्साहात संपन्न बार्शीचे प्रा. डॉ. राहुल पालके आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात ‘नेट’ परीक्षा उत्तीर्णएकूण ८ विषयात तब्बल २० व्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम