पंढरपूर प्रतिनिधी: विश्व हिंदू परिषद वतीने जाती पाती छोडो और सारे हिंदू जोडो आशा घोषणा देत समरसतर यात्रारथ पंढरपूरातील मेहतर कॉलनी येथे दाखल झाली. या समरसता यात्रेचा रथ मागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथून सुरू बार्शी, कुर्डुवाडी, अरण, मंगळवेढा मार्गे पंढरी नगरीत दाखल झाला .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार यांनी सामाजिक न्यायासह हिंदू समाजात परस्पर सन्मान आणि समानता निर्माण व्हावी या साठीच कार्य केले. अस्पृश्यता आणि जातीभेद मिटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने अनेक आंदोलने आणि सामाजिक उपक्रम राबवले.
या समरसता यात्रेतून गावा गावातील सर्वच मंदिरातून सर्व जातींना प्रवेश तसेच एक गाव एक स्मशान तसेच सनातन राष्ट्र,कन्या-भगिनी, मंदिर- संत यांचे रक्षण करणे , सामाजिक व्यवहारातून अस्पृश्यता आणि उच्चनीयता संपवणे आणि समर्थ राष्ट्राची निर्मिती करून हिंदू सारा एक हा भाव मनामध्ये प्रकट करण्याचा संदेश सर्व हिंदू बांधवांना देण्यात आला.

यावेळी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रीय मंत्री श्री नरेशजी पाटील, प्रांतअध्यक्ष श्री गजाननजी धरणेसर, प्रांत मंत्री श्री किशोरजी चव्हाण, प्रांत समरसता प्रमुख श्री निखिलजी कुलकर्णी,विभाग सहमंत्री श्री विजय राव पिसे, समरसता प्रांत सदस्य रवींद्र साळे, जिल्हा सहमंत्री श्री गोपाळ सुरवसे , बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीतराव, नगरसेवक श्री सौरभजी थिटे समाज सेवक,श्री अंबादासजी दोडिया, मातृशक्तिविभाग संयोजिका सौ.मालतीताई गंभीर श्री तुकारामजी खंदाडेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!