दुहेरी कास्य पदक विजेता रुद्रनील पाटीलचा साताऱ्याचा गौरव

सातारा वृत्तसेवा :

रुद्रनील अजित पाटील याने रांची येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांध्ये इंडस्युअल परसूट 2 किलोमीटर प्रकारात कास्य पदक मिळवलं, तसेच महाराष्ट्र संघाला 1 किलोमीटर टीम स्प्रिंट याप्रकारात कास्य पदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले,
रुद्रनील हा सातारा मधील गुरुकुल सेकेंडरी स्कूल मध्ये इयत्ता 8 वीत शिकत आहे,तो ट्रॅक सायकलिंग चा सराव बालेवाडी पुणे येथील ट्रॅक वरती करतो फिनिक्स सायकलिंग अकॅडेमी चे सर्व्हेसरवा व राष्ट्रीय प्रशिक्षक श्री दर्शन बरगुजे त्याला प्रशिक्षण देतात, बालेवाडी क्रीडाप्रबोधणीच्या प्राचार्या व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ दिपाली पाटील, आणि सौ दीपाली शिळदणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले,
रुद्रनील ने 17 वर्षेखालील मुले वयोगटात पदार्पनात चमकदार कामगिरी करत व्ययक्तित आणि महाराष्ट्र संघाला असे 2 कास्य पडकाची कमाई करुन दिली,
तो रोज 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग चा सराव करतो, सातारा मध्ये असताना मेढा रस्ता, कास रस्ता आणि पुणे येथे देहूरोड लोणावळा असा त्याचा नित्यानीमाने सराव असत, रुद्रनील ला राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक मिळण्याचे दुसरं वर्ष आहे, याआधी पण त्याने 14 वर्षे खालील मुलांच्या वयोगटात रजत पदक मिळवले आहे, त्याची महाराष्ट्रातून 2025-26 वर्षासाठी खेलो इंडिया अथलीतट म्हणून पण निवड झाली आहे सायकलिंग साठी महाराष्ट्रातून तो एकमेव खेळाडू आहे,
रुद्रनील च्या यशमागे गुरुकुल शाळेचे अध्यक्ष श्री राजेंद्र चोरगे, मुख्याध्यपिका, क्रीडा शिक्षक, सर्व स्टाफ तसेच त्याचे प्रसिक्षक श्री दर्शन बरगुजे, सौ दीपाली मॅडम आई सौ प्रियांका वडील अजित पाटील यांचे मोठे योगदान आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!