गोंदवले (प्रतिनिधी)–
दि. 30 जानेवारी 2026 रोजी पानवण, वडजल तालुका माण या ठिकाणी महिला बांधकाम कामगार यांचा मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम बांधकाम कामगार महासंघ सातारा जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांचे स्वागत व प्रमुख पदाधिकारी यांचे स्वागत सौ.अस्मिता तुपे यांनी केले.
या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन सौ रेश्माताई शिलवंत (उपाध्यक्ष बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश) यांचे झाले.सौ शिलवंत यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बांधकाम कामगारांच्या नोंदणी विषयी अडचणी, कामगारांचे नूतनीकरण व नूतनीकरणाचे फायदे,शैक्षणिक लाभ, कामगारांचे मृत्यू विषयी लाभ, घरकुल योजना, बांधकाम कामगार यांच्या मुलीच्या लग्नाविषयीची योजना,बांधकाम कामगारांना दिला जाणारा भांडी आणि सुरक्षा व अत्यावश्यक संच चा लाभ, नोंदीत कामगारांना दिले जाणारी प्रशिक्षण या विषयी माहिती दिली.
बांधकाम कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी बांधकाम कामगारांच्या साठी वेळोवेळी केलेली आंदोलने, मोर्चे काढून सरकार दरबारी प्रश्न मांडून या सर्व योजना सुरू करून घेतलेले आहेत. या सर्व योजना तयार करून शासनाकडून मंजूर करून घेण्यामध्ये इतर संघटना व एजंट यांचा कसलाही हातभार नाही. भारतीय मजदूर संघ ही कामगार क्षेत्रात काम करणारी एक नंबरची कामगार संघटना असून 23 जुलै 1955 पासून आज पर्यंत गेली 71 वर्ष अविरत काम चालू आहे. केंद्र सरकारने उद्योग म्हणून घोषित केलेल्या 45 उद्योगांमध्येही संघटित व असंघटित क्षेत्रांमध्ये भारतीय मजदूर संघाचे सभासद आहेत. देशातली एक मोठी व अग्रगण्य कामगार संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते. सर्व बांधकाम कामगार बंधू आणि भगिनी यांनी या संघटने कडे आपले सभासद नोंदवून संघटना शक्ती वाढवावी असे अवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्यात उपस्थित सर्व महिला व पदाधिकारी यांचे आभार प्रदर्शन सौ मनीषा वाघमारे यांनी केले.
या मेळाव्यास भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते श्री शामराव गोळे श्री राजेंद्र काळे (कार्याध्यक्ष) श्री सतिश सावंत (अध्यक्ष) श्री रविंद्र माने (जिल्हा चिटणीस) श्री विनोद केंजळे, श्री रामचंद्र जाधव,अश्विनी सातपुते, उर्मिला वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

